Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गोवर्धन येथील सरपंचाचा राजीनामा.

 गोवर्धन येथील सरपंचाचा राजीनामा.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर.  

-------------------------------     

रिसोड : -  तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेली आणि ११ सदस्य संख्या असलेल्या गोवर्धन ग्रामपंचायत च्या सरपंचाने दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी  सभापती  पंचायत समिती सभापती यांच्याकडे राजीनामा सादर केला सरपंच गजानन वानखेडे यांनी मागील तीन वर्ष गोवर्धन ग्रामपंचायत चा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने यावेळी गजानन वानखेडे सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही दबाव आला बळी न पडता मी माझ्या  स्वखुषीने व कोणाला तरी संधी मिळावी या अनुषंगाने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले त्यांच्या राजीनामामुळे गोवर्धन ग्रामपंचायत ची निवडणूक रंगणार मात्र एवढे खरे अशी चर्चा गोवर्धन परिसरात रंगत आहे अकरा सदस्य संख्या असलेल्या गोवर्धन ग्रामपंचायत मध्ये दोन पॅनल समोरासमोर लढले होत्या यावेळी एका ग्रामपंचायती एका पॅनलचे सहा तर दुसऱ्या पॅनलचे पाच सदस्य निवडून आले होते ज्या पॅनलचे सहा सदस्य निवडून आले होते त्याच पॅनल मध्ये गजानन वानखडे सरपंच पदावर तीन वर्षांपूर्वी विराजमान झाले होते परंतु आता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे नेमकं कोण सरपंच होणार याकडे गावकऱ्यांचे व परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments