चि . संस्कार जगताप निघाला बेंगलोरला.
चि . संस्कार जगताप निघाला बेंगलोरला.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
प्रमोद पंडित
--------------------------
भणंग - प्राथमिक केंद्र शाळा भणंग या शाळेतील शिष्यवृती धारक विद्यार्थि चि . संस्कार गणेश जगताप यांची भारतीय अंतराळ विज्ञान संस्थेच्या (इस्रो) अभ्यासक्रम सहलीसाठी निवड झाली .
भणंगचे लोकनियुक्त सरपंच श्री गणेश साईबाबा जगताप यांचे चिरंजिव कु संस्कार गणेश जगताप याची निवड भारतीय अंतराळ विज्ञान सस्थेच्या [ इस्त्रो ] अभ्यासक्रम सहलीसाठी करण्यात आली आहे .
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील एकूण ४१ विद्यार्थ्याची इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी झालेल्या निवडी मध्ये भणंग शाळेतून चि . संस्कार याची निवड झाली .
केंद्र शाळा भणंगचे मुख्यधापक श्री धनावडे , श्री अशोक लकडे , श्री ओबळे , श्री भिसे गुरुजी आणि सौ साळुंखे मॅडम या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
हनुमान उदय मंडळ भणंग , ग्रामपंचायत भणंग , ग्रामस्थ मंडळ भणंग यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे आभार व अभिनंदन केले संस्कारला अभिनंदन व पुढील वाटचालीस दैनिक सुपर भारत कोल्हापूर च्यावतीने खूप खूप शुभेच्छा .
Comments
Post a Comment