ग्राहक हित समिती’च्या प्रदेशाध्यक्षपदी संदीपकुमार जाधव.
ग्राहक हित समिती’च्या प्रदेशाध्यक्षपदी संदीपकुमार जाधव.
---------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर.
---------------------------------
ग्राहक हित समिती, महाराष्ट्र ही संस्था ग्राहक हक्क व अधिकार याविषयी 2011 पासून महाराष्ट्रात काम करणारी अग्रेसर संघटना आहे. या संघटनेची सर्वसाधारण सभा हिंदुस्तान अँटिबोटिक्स वेल्फेअर सेंटर कॉलनी, पिंपरी चिंचवड येथील क्लब हाऊस येथे पार पडली. या सभेत संघटनेचे महाराष्ट्राचे संघटक म्हणून काम पाहत असलेले संदीपकुमार जाधव यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.दीपक कटारिया यांनी नियुक्तीपत्र देऊन सदर निवडीची अधिकृत घोषणा केली.
यावेळी डॉ दीपक कटारिया म्हणाले, ‘‘दरवर्षी संघटनेमध्ये फेर बदल होत असतात परंतु यावर्षी आपण तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली आहे. या नवीन पदाधिकार्यांनी संधीचा उपयोग ग्राहक संरक्षण हितार्थ करावा व संघटनेचे नावलौकि वाढवण्याकरिता प्रयत्न करावा.’’
‘‘समाजात अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत आहे. ग्राहकांमध्ये ग्राहकांच्या हक्काविषयी जनजागृती करत संघटना वाढवण्याच्या हेतूने सतत प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी दिली.
यावेळी संघटनेच्या इतर पदांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. पंडित गायकवाड, अॅड. प्रवीण जाधव, अॅड. वसंती जाधव, अॅड. खेताराम सोलंकी यांची तर सांगली जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, सातारा जिल्हा अध्यक्ष अनिल केदारी, उपाध्यक्ष संजय माने, सचिव कृष्णांत तरडे, कार्याध्यक्ष प्रकाश नांदेले, पाटण तालुका अध्यक्षपदी अशोक कुलगुडे, फलटण तालुकाध्यक्षपदी सुनील वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र मदने, सचिव अजित नांदेड, कार्याध्यक्ष ऋषिकेश नलवडे तर पुणे शहराध्यक्षपदी महेश शिर्के, उपाध्यक्ष निखिल भरेकर, कार्याध्यक्ष मंगेश थोरात, सचिव प्राजक्ता जाधव, सहसचिव संतोष चौधरी आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिल शिंदे व आभार प्रदर्शन प्राजक्ता जाधव यांनी केले.
फोटो कॅप्शन : संदीपकुमार जाधव यांना नियुक्तीपत्र देताना डॉ.दीपक कटारिया. सोबत अॅड. प्रवीण जाधव, महेश शिर्के, प्रकाश नांदेड, रणजीतसिंग चानंडोके, सुनील वाघ, इकबाल खान, मोनिल शिंदे.
Comments
Post a Comment