Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक; पोनि चिंचोलकरांना दिले निवेदन

 सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक; पोनि चिंचोलकरांना दिले निवेदन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पाटील 

-------------------------------------

     सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि.(१४) फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याचे व सदरील बंद उग्र आंदोलन न करता, संविधानीक मार्गाने शांततेत करत असल्याचे निवेदन सकल मराठा समाज लोहाच्या वतीने लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना देण्यात आले.

       सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षणा संदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या करून अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात करण्यात यावे. एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दि.(१०) फेब्रुवारी पासून अंतरवाली सराटी अमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची तब्येत वरचेवर खालावत असून दिवसेंदिवस धोका संभवत आहे. यास सर्वस्वी सरकार जबाबदार असून करिता सकल मराठा समाजाच्या कडून दि.(१४) फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.बंद उग्र आंदोलन न करता, संविधानीक मार्गाने शांततेत पार पाडावा यासाठी आवाहनही करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून  बंदोबस्त सहकार्य करण्यासाठी सकल मराठा समाज लोहाच्या वतीने संग्राम डिकळे, गजानन चव्हाण,भानुदास पवार,रितेश बारोळे, गोविंद वडजे, बाबासाहेब कदम यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments