Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आकाश चेलानी या विद्यार्थ्याने यूएसए युनिव्हर्सिटीच्या एकाच वेळी सात शिष्यवृत्ती संपादित केल्या.

 आकाश चेलानी या विद्यार्थ्याने यूएसए युनिव्हर्सिटीच्या एकाच वेळी सात शिष्यवृत्ती संपादित केल्या.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

----------------------------

उचगांव ( प्रतिनिधी ) कोल्हापूर येथील कुमार आकाश चेलानी या विद्यार्थ्याने नोव्हेंबर मध्ये भारतात घेण्यात आलेल्या Ei Asset Talent Search मध्ये गोल्ड स्कॉलर सर्टिफिकेट मिळवले आहे. एकाच वेळी सात शिष्यवृत्ती घेणार तो देशातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.त्याने आपल्या बुद्धीची चमक दाखवत यु एस ए युनिव्हर्सिटीच्या सात शिष्यवृत्ती एकाच वेळी संपादित केल्या आहेत.  त्यामध्ये नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट,  नॉर्थ वेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट समर रेसिडेंट प्रोग्राम फ्रॉम यूएसए युनिव्हर्सिटी, Purdue युनिव्हर्सिटीस गेरी स्टार प्रोग्राम फॉर्म यूएसए युनिव्हर्सिटी

,  समर इन्स्टिट्यूट फॉर गिफ्टेड प्रोग्रॅम्स फ्रॉम यूएसए युनिव्हर्सिटी,   नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट सिव्हिल लीडरशिप इन्स्टिट्यूट फ्रॉम यूएसए युनिव्हर्सिटी

, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (berekley) अकॅडमी टॅलेट डेव्हलपमेंट प्रोग्राम (ATDP) फॉर यूएसए युनिव्हर्सिटी आणि  गिफ्टेड समर प्रोग्राम बाय genwise फ्रॉम मणिपाल युनिव्हर्सिटी, या शिष्यवृत्तीचा समावेश आहे. तो उचगाव  येथील विबगीयोर इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला 

शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शर्मा व उपमुख्याध्यापिका  प्रियंका पाटील, आई रिंपल चेलानी त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments