जुन्या भांडणावरुन चिंचवाडमध्ये दोन गटात मारामारी. परस्परविरोधी तक्रार दाखल.
जुन्या भांडणावरुन चिंचवाडमध्ये दोन गटात मारामारी. परस्परविरोधी तक्रार दाखल.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
गांधीनगर, ता.१२ः चिंचवाड (ता. करवीर) येथे उरुस सुरु असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केल्यामुळे सुमित रमेश घाटगे, रितेश सावंत आणि रोहित घाटगे हे जखमी झाल्याची फिर्याद सुमित घाटगे याने दिली असून याच कारणावरुन प्रबुध्द रमेश बळे आणि कौशल फडतरे हे जखमी झाल्याची फिर्याद प्रबुध्द बळे याने दिली आहे. गांधीनगर पोलीसांत या हाणामारीप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी की, चिंचवाडच्या उरुसानिमित्त सुमित घाटगे हा आपला मित्र रितेश सावंत याला जेवायला बोलाविण्यास जात असताना स्वप्नील कांबळे आणि त्याच्या पाच मित्रांनी सुमित याला अडवले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. यावेळी सुमितचा भाऊ रोहित आणि मित्र रितेश यांनाही त्यांनी मारहाण केल्याची फिर्याद सुमित यांनी दिली. सुमित याच्या फिर्यादीनुसार स्वप्नील कांबळे, सोहम कांबळे, कौशल्या फडतरे (तिघे रा. चिंचवाड), प्रभु कांबळे, सनी गोंधळी (दोघे रा. गडमुडशिंगी) आणि शुभम कांबळे (रा. शिरदवाड, ता. शिरोळ) या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तर प्रबुध्द रमेश बळे (रा. गडमुडशिंगी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रबुध्द आणि त्याचा मित्र स्वप्नील कांबळे याचे दारात थांबले असता जुन्या भांडणावरुन सुमितसह सहाजणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रबुध्द याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुमित घाटगे, राहुल ढेरे, रितेश सावंत, अमर कांबळे, तुषार सावंत, रोहित घाटगे (सर्व रा. चिंचवाड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुतार करत आहेत.
-------------------
Comments
Post a Comment