महाबळेश्र्वर नगरपरिषद मधील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या निधीची व निकृष्ट कामांची चौकशी करा: किरण बगाडे

 महाबळेश्र्वर नगरपरिषद मधील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या निधीची व निकृष्ट कामांची चौकशी करा: किरण बगाडे.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

--------------------------------

 मा.जिल्हाधिकारी सो. सातारा यांना निवेदनाद्वारे RPI (A) जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी केली मागणी. 

उपरोक्त वरील विषयानुसार महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमध्ये सन.2021/22 अंतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून विविध कामासाठी निधी आला त्यातून पर्यटन स्थळ चां दर्जा वाढवावा यासाठी अनेक कामे झाली त्यातून पेटी लायब्ररी इमारत रेनीवेशन मधील कामामध्ये वापरण्यात आलेल्या जांबा दगड,वाळू पत्रे लोखंड वापरलेला सदर वस्तू निकृष्ट व दर्जाहीन पद्धतीच्या वापरल्याने भविष्यकाळात इमारतीस धोका पोहोचल्यास प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहणार का? तसेच ते काम करत असताना त्या कामाचा दर्जाचा अहवाल तसेच वापरण्यास आलेल्या वस्तूच्या नमुना चाचणी अहवाल तसेच कामाची वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत SQM समितीमार्फत तथा कॉलिटी कंट्रोलच्या समितीमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणी केली का याचा अहवालाचा खुलासा करण्यात यावा . तसेच संबंधित बांधकाम अधिकारी शाखा अभियंता,नगर रचना अधिकारी यांच्या संपूर्ण कामकाजाची फेर चौकशी करून निकृष्ट काम केलेल्या ठेकेदाराला काळे यादीत टाका असे न झाल्यास आझाद मैदान मुंबई या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने आंदोलन छेडणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.