Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाद्य पुजनातून उमगले आई-वडीलांच्या कष्टाचे महत्त्व.

 पाद्य पुजनातून उमगले आई-वडीलांच्या कष्टाचे महत्त्व.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी  प्रतिनिधी 

विजय बकरे

----------------------------

- मुले आणि आई-वडिलांच्या नात्यातील संवाद कमी होत चालला आहे, त्यामुळे मुलांना आपल्या आई - वडिलांचे महत्त्व कळावे आणि त्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी, या हेतूने राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर बनाचीवाडी येथे मंत्रोच्यारासह आपल्या आई-वडीलांचे पाद्य पूजन केले. तसेच गळाभेट घेत कृतज्ञता व्यक्त केली.. 

                   प्रल्हाद एकावडे व त्यांच्या परिवाराच्या संयोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग शिक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे आध्यात्मिक व भावपूर्ण वातावरणात पाद्य पूजन केले. यावेळी गावचे सरपंच प्राजक्ता पत्ताडे, केंद्रप्रमुख प्रकाश कानकेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा पत्ताडे, सदस्य रतन पत्ताडे , सौ. सिया पालकर, सौ. लता एकावडे, प्रणित एकावडे, प्रसाद एकावडे यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते.

              बदलत्या काळात आपण आपली संस्कृती विसरून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आहोत. आपल्या आयुष्यातील आई-वडिलांच्या योगदानाची जाणीव व्हावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचेही पाद्यपूजन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी अनेकांना गहिवरून आले. याप्रसंगी योगशिक्षक दत्तात्रय पाटील यांनी अशा विधायक उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले. बदलती जीवनशैली व बदलत्या काळात या कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. 

                  या सोहळ्यामुळे आम्हाला आमचे बालपण आठवले. आमच्या आई-वडिलांनी आमच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी एका क्षणात आमच्या डोळ्यासमोर आल्या. त्यांच्या उपकारांची परतफेड आमच्याकडून राहून गेली, अशी खंत यावेळी उपस्थित केली.. 

             जयवंत पत्ताडे यांनी समारोपाचे भाषण केले. मुख्याध्यापक मिलिंद तोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिर बनाचीवाडीचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास आरडे, आभार सौ.वृषाली प्रणित एकावडे यांनी केले..

Post a Comment

0 Comments