Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एल.आय.सी शाखेस भेट.

 किसन वीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एल.आय.सी शाखेस भेट.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

-------------------------------

      किसन वीर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने बी.कॉम भाग १ च्या विद्यार्थ्यांसाठी एल.आय.सी शाखा वाई या ठिकाणी अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.

 सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्यांना व्यवहारिक ज्ञानाची ओळख व्हावी,या हेतूने ही अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.

 मा. शिवा पटनाईक शाखा प्रबंधक एल.आय.सी शाखा वाई यांनी विद्यार्थ्यांना आयुर्विमा क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती,मृत्यूदावे,वारस नोंद विमेदाराचे हक्क व अधिकार, आयुर्विमा पॉलिसीचे विविध प्रकार व फायदे इत्यादी अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले. या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही.तसेच यश मिळवण्यासाठी कोणताच शॉर्टकट नसतो. असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. सौ अश्विनी चव्हाण विकास अधिकारी एल.आय.सी शाखा यांनी शाखेतील विविध विभाग व त्यांची कार्यपद्धती मुलांना प्रत्यक्ष समजावून सांगितली. या भेटीमध्ये एकूण ४२ विद्यार्थी सहभागी झाले होते या भेटीचे नियोजन प्रा. दिपाली चव्हाण यांनी केले. तसेच प्रा. रवींद्र जमदाडे व प्रा. श्रुती यादव यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments