स्वरा वांगडे वाचन प्रेरणा स्पर्धेत राज्यात प्रथम.प्रिया गणेश भोसले तृतीय.

 स्वरा वांगडे वाचन प्रेरणा स्पर्धेत राज्यात प्रथम.प्रिया गणेश भोसले तृतीय.


----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी 

----------------------------

  - जावळीची राजधानी मेढा येथील वेदांत क्लासेसच्या सौ रेखा संजय वांगडे यांची कन्या स्वरा हिने वाचन प्रेरणा स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच मेढा येथील उद्योगपती गणेश भोसले यांची कन्या प्रिया हिने सुद्धा राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे

शुद्ध बीजा पोटी ‌फळे रसाळ गोमटी! स्वराची आई ही वेदांत क्लासेस च्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करत आहे तर वडील कुसुंबी ,मेढा या ठिकाणी औषध सेवेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत

छ्त्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे वाचन करून त्या पुस्तकावर आधारित  २५ ते ५० ओळीमध्ये अभिप्राय स्वहस्ताक्षरात लेखन करून 

स्पर्धेमध्ये सादर करावयाचे होते

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य यांचे वतीने राज्यस्तरीय वाचन प्रेरणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जावळीची राजधानी मेढा येथील , जि.प. केंद्र शाळा मेढा ची विद्यार्थीनी कु स्वरा संजय वांगडे  हिने राज्यात पहिला क्रमांक मिळविला . कु. वेदा विनायक चव्हाण (द्वितीय क्रमांक) लाहोटी कन्या प्रशाला, कराड ता. कराड जि.सातारा, कु. प्रिया गणेश भोसले (तृतीय क्रमांक ) जि.प.केंद्र शाळा मेढा ता.जावली जि. सातारा यांनी अतिशय सुंदर लेखन करून या स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादित केल्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापिका सौ संजिवनी मुळे मॅडम  ,वर्गशिक्षिका  अनुपमा दाभाडे मॅडम तसेच शिक्षक स्टाफ यांचेतर्फे कौतुकाची थाप मिळत आहे. स्वरा रेखा संजय वांगडे हिने आजपर्यंत अग्निपंख- माधुरी शानबाग, श्यामचीआई- साने गुरुजी, एक होता कार्व्हर- विना  गव्हाणकर, पावनखिंड- रणजीत देसाई, राधेय -रणजित देसाई, तोत्तोचान- चेतना सर देशमुख गोसावी, शिवचरित्र -दत्ताजी नलावडे, अशा अनेक पुस्तकांचे वाचन केले आहे लहान वयापासूनच तिला वाचनाची आवड आहे

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना स्पर्धात्मक परीक्षा मध्ये तसेच विविध स्पर्धेमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पालकांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी यापुढेही नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातील तसेच सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आई प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यक्रमात होणार असून सन्मान चिन्ह, सन्मानपत्र पुस्तक, पेन, मानाचा फेटा इत्यादी बक्षिसाचे स्वरूप असल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश तांबे यांनी सांगितले. कु स्वरा हिने प्रथम क्रमांक व कु प्रिया भोसले यांनी तृतिय क्रमांक मिळवले बद्दल आम्ही जावळीकर,अखिल भारतीय मराठा महासंघ  जावळी, साताराचे वतीने  त्यांना शुभेच्छा देणेत आल्या

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.