जिल्हास्तरीयप्रश्नमंजुषा स्पर्धेत बिभवी शाळेचे सुयश.

 जिल्हास्तरीयप्रश्नमंजुषा स्पर्धेत बिभवी शाळेचे सुयश.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी

शेखर जाधव 

-----------------------------------

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धेत जिल्हास्तर*प्रश्नमंजूषा स्पर्धा*( लहान गट ) इ. १ ते ५ वी.यामध्ये जिल्हा परिषद प्राथ.शाळा बिभवी ता. जावली जि सातारा येथील विद्यार्थांनी सुयश संपादन केले.      या प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये जिल्हास्तर उपविजेता संघातील विद्यार्थी १) पूर्वी आनंदा देशमुख २) वैदेही सुभाष मर्ढेकर ३) प्रज्वल सचिन दुंदळे हे सहभागी झाले. त्यांना सौ. सुनिता कामटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. त्याबरोबर मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर वेंदे सहकारी शिक्षिका सौ. दिपाली दुंदळे , सौ. अमिता एरंडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा स्तरावर द्वितीयक्रमांक मिळवून उपविजेते पद मिळवले आहे.      या यशाबद्दल जावली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. संजय धुमाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. तोडरमल मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कर्णे साहेब. केंद्रप्रमुख श्री अरविंद दळवी साहेब तसेच बिभवी गावचे सरपंच, उपसरपंच , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य , ग्रामस्थमंडळ बिभवी व रिटकवली, आजी माजी विद्यार्थी , शाळाप्रेमी पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन केले .💐💐💐💐💐

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.