राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत राणाप्रताप ला चतुर्थ क्रमांक.
राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत राणाप्रताप ला चतुर्थ क्रमांक.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------
चंदगड येथे जेडी स्पोर्टस् क्लबने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत येथील राणाप्रताप क्रीडा मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला .
राणाप्रताप हॉलीबॉल संघाने बेळगांव , कोल्हापूर जिल्हा हॉलीबॉल ' ब ' संघ यांना पराभूत केले . उपांत्य फेरीत चंदगड संघाबरोबर झालेल्या चुरशीच्या लढतीत संघाला पराभव पत्करावा लागला . त्यामुळे संघास चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले .
संघातील खेळाडू असे : विवेक चौगले , श्रावण कळांद्रे , करण मांगले , गजानन गोधडे , करण भोसले , ओंकार लोकरे , अजित गुरव , रविंद्र हळदकर , निखील पाटील , निखील सावंत , चिनु साळोखे , जीवन गोधडे
या खेळाडूंना हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव
कानकेकर , संभाजी मांगले, अजित गोधडे , विनोद रणवरे , सुहास भारमल, अमित साळोखे, ओंकार चौगले , हर्षद चौगले , रणजीत मोहिते यांचे मार्गदर्शन तर राणाप्रतापचे अध्यक्ष सुखदेव येरुडकर यांचे प्रोत्साहन लाभले .
Comments
Post a Comment