‘किसन वीर’ मधील एन.एस. एस. व एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांचे दिव्यांगाना सहकार्य.

 ‘किसन वीर’ मधील एन.एस. एस. व एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांचे दिव्यांगाना सहकार्य.

----------------------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे 
--------------------------------------------------
दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करताना वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे पदाधिकारी व  किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थी

वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना वाई पंचायत समितीच्या वतीने वाई विकास गटातील ४३१ दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रीम अंग निर्माण निगम, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले. व्हील चेअर , स्वयंचलित सायकल, चालण्याची काठी, श्रवण यंत्र, स्मार्ट फोन, अंध व्यक्तींची चालण्याची काठी अशा वस्तूंचे वाटप करताना एन.एस. एस. चे स्वयंसेवक व एन. सी. सी. चे छात्र यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना मंच्यापर्यंत घेऊन जाणे, जागेवर बसण्यासाठी मदत करणे. चालता न येणाऱ्या दिव्यांगाना उचलून कार्यक्रम स्थळी घेऊन जाणे, त्यांना फूड पाकीट व पाणी देणे. असे सेवाभाव मनात ठेवून विद्यार्थ्यांनी वाई तालुक्यातील दिव्यांगाना मदतीचा हात दिला. या समाजोपयोगी कामातून समाधान मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. 

सदर विद्यार्थ्यांचे वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे खंबीर पाठबळ मिळाले. प्रकल्प अधिकारी  डॉ. संग्राम थोरात, कॅप्ट. डॉ. समीर पवार व डॉ. अंबादास सकट यांनी त्याचे नेटके नियोजन केले.

 याकामी  एन.एस. एस. चे स्वयंसेवक व एन. सी. सी. चे छात्र सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.