Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेल्हाळ येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेस लोकसभेचे संभाव्य भाजप उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी लावली उपस्थिती.

 शेल्हाळ येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेस लोकसभेचे संभाव्य भाजप उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी लावली उपस्थिती.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा, प्रतिनिधी

अंबादास पवार 

------------------------------

                 राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन शेल्हाळ ता. उदगीर येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. सदरील स्पर्धेस लातूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी हजेरी लावत भजन स्पर्धेतील भक्तिरासाचा आनंद घेतला.

               अवघ्या कांहीं कळवधीवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईचूक कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर लोकसभेचे संभाव्य भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी स्वतःच्या मूळ शेल्हाळ (ता. उदगीर) या गावी राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने त्यांनी सदर स्पर्धेत हजेरी लावून भजन स्पर्धेत भक्तिरसाचा आनंद घेतला.

             सदरील स्पर्धेस राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खा. सुधाकर श्रृंगारे, हभप भास्कर महाराज, हभप प्रशांत महाराज, हभप विठ्ठल महाराज सांडोळकर आदीसह लातूर जि. प. चे माजी सभापती बापूरावजी राठोड, मुंबई येथील नगरसेवक किरणजी लांडगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, भागवन पाटील तळेगावकर, प्रीतीताई भोसले, राम प्रतिष्ठानचे सतीश पाटील, रंजीत कांबळे, संतोष पाटील, रामेश्वर पाटील, साधू लोणीकर, अनिल कल्याणी, प्रा. विवेक सुकणे, उदगीरचे तहसीलदार विकास बिराजदार, गटविकास अधिकारी प्रवीण, वैभव कोयले, माधव कल्याणी सह बहुसंख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments