महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 'कोल्हापूर संस्कृती दर्शन' उपक्रम प्रेरणादायी- प्रशासक के. मंजुलक्ष्मी.

 महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 'कोल्हापूर संस्कृती दर्शन' उपक्रम प्रेरणादायी- प्रशासक के. मंजुलक्ष्मी.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी

रजनी कुंभार 

---------------------------------------

कोल्हापूर ता.07 : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या 17 विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे नुकतेच इस्रो (ISRO) बेंगलुरु येथे विमानाने अभ्यास दौऱ्यास पाठविण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहर क्षेत्रातील ऐतिहासिकदृष्टया / सांस्कृतिकदृष्टया महत्वाची ठिकाणे दाखविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत 'कोल्हापूर दर्शन' हा उपक्रम दि.7 फेब्रुवारी ते दि.5 एप्रिल 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या मुख्य चौकात सकाळीच महापालिकेचे भाऊसो महागांवकर शाळेचे विद्यार्थी घेऊन पहिली बस रवाना झाली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वहात होता. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले व उपक्रमाचे कौतुक केले.


            यावेळी विद्यार्थ्यांना सदर उपक्रम प्रेरणादायी असून त्यांच्या ज्ञानात भर घालणारा आहे, महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले असलेचे मत के.मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केले.


हा उपक्रम 46 दिवस चालणार असून महिला व बालकल्याण विभागामार्फत यासाठी 6.44 लक्ष इतका खर्च करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत दररोज एका बसचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळेतील 3500 विद्यार्थ्यांना शाळानिहाय व दिवसनिहाय कोल्हापूर दर्शन घडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन, शालेय पोषण आहार, प्रत्येक विद्यार्थ्यांस दोन गणवेश, बुट, सॉक्स, पाठयपुस्तके इत्यादी साहित्य समग्र शिक्षा मार्फत मोफत पुरविले जाते. दि.28 फेब्रुवारी 2024 रोजी हा दिन विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शास्त्रज्ञामार्फत ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन महापालिकेच्या सर्व शाळेमध्ये आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नामवंत शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिका शाळांमधून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सीएसआर मधून मुंबईच्या नामवंत उद्योगपती कडून निधी मागणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला असलेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी सांगितले.


यावेळी माजी महापौर आर के पोवार, उपआयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, महिला व बाल कल्याण समितीच्या प्रिती घाटोळे, प्राथमिक शिक्षण समिती कडील सहा. प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, सुर्यकांत ढाले, संजय शिंदे, अजय गोसावी, शांताराम सुतार, राजाराम शिंदे, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.