सेवानिवृत्त गणित शिक्षकांचा सत्कार संपन्न .

 सेवानिवृत्त गणित शिक्षकांचा सत्कार संपन्न .

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर.

----------------------------------

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे आयोजन.

.महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ रिसोड तालुक्याच्या वतीने रिसोड तालुक्यातील गणित विषयासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या गणित शिक्षकांचा सत्कार सोमवार दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भारत माध्यमिक शाळा रिसोड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे,प्रमुख अतिथी डॉ विनोद कुलकर्णी प्राचार्य उत्तमचंद बगाडिया महाविद्यालय रिसोड,दिनेश पळसकर परीक्षा प्रमुख, रवि अंभोरे जिल्हा उपाध्यक्ष गणित अध्यापक महामंडळ, निलेश पुंड जिल्हा संघटक व तालुक्यातील सेवानिवृत्त झालेले गणित शिक्षक सत्कारमूर्ती म्हणून सी.एम देशमाने माजी प्राचार्य पंडित नेहरू विद्यालय कवठा. जोगडे सर मा. मुख्यध्यापक ज्ञानेश्वर विद्यालय करडा,दीपक खंदारे मा. प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय गोभनी, एस के देशमुख मा.मुख्याध्यापक पंजाबराव देशमुख विद्यालय रिसोड, साबळे सर भा मा शाळा चिंचाबा पेन, आव्हाड सर माजी प्राचार्य भारत माध्यमिक विद्यालय चिचाबा भर,जयंत वसमतकर पर्यवेक्षक संत सखाराम महाराज विद्यालय लोणी,गजानन मुलंगे माजी प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय भर जहांगीर इत्यादी उपस्थित होते. डॉ. विनोद कुलकर्णी यांनी गणित विषयातील सद्य स्थितीतील उणीवा व त्यावरील उपाय याविषयीं मार्गदर्शन केले. गणित विषय हा ऑनलाईन पद्धतीने कधीच अध्ययन व अध्यापन करता येत नाही. गणितातील संबोध, संकल्पना समजण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापन होणे आवश्यक आहे. गणित विषयांचे उपयोजन दैनंदिन जीवनात होते याची जाणीव विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनातून गणित शिक्षक करून देतात त्यामुळे गणिताची आवड निर्माण होते.गणित शिक्षक हा शाळेचा महत्वाचा घटक असून त्यांचा समाजात मानसन्मान असतो असे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत शिंदे यांनी या सेवानिवृत्त गणित शिक्षकांचा सत्कार करून रिसोड तालुक्याने एक नवीन पायंडा पाडला आहे असेच उपक्रम जिल्हास्तरावर आयोजित करून गणित शिक्षकांचा सन्मान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सत्कार्मुर्तीच्या वतीने जयंत वसमतकर व गजानन मुलंगे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे रिसोड तालुका अध्यक्ष दिनकर कानडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर आर काळदाते यांनी व आभार तालुका उपाध्यक्ष उद्धव मोरे यांनी केले.सत्कार समारंभाच्या यशस्वीतेसाठी रिसोड तालुका गणित अध्यापक महामंडळाच्या पदाधिकारी व सदस्य शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.