Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उजळाईवाडीच्या पसरीचा नगर खाकी वर्दीच्या वसाहतीत गुंडाचा वावर.अवैध धंद्यांचा विळखा घट्ट पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज.

 उजळाईवाडीच्या पसरीचा नगर  खाकी वर्दीच्या वसाहतीत गुंडाचा वावर.अवैध धंद्यांचा विळखा घट्ट पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------------

उजळाईवाडी (ता. करवीर) येथे

पोलीस महासंचालक डॉ.पी. एस. पसरिचानगर हे १२ ते १५ एकर मध्ये विस्तारले आहे. या पोलिसांच्या निवासस्थान असलेल्या रहिवासी क्षेत्रात सध्या  अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे. या भागातील  नागरिक, महिला , युवती  जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. येथे मद्यपींचे ओपन बार वाढल्याने सायकळी सात नंतर उघड्या माळरानात मद्यपीचे येणे जाणे वाढले आहे.येथे दारूच्या बाटल्यांचा खच्च पडला आहे. त्या बरोबर प्रवेशव्दार जवळचं अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत प्रेमीयुगुलांचे,वेश्या व्यवसाय व इतर जोडप्यांचे अश्लील 

चाळे येथे सुरू आहेत.येथे भुरट्या गुंडाचा वावर अधिक आहे.२ दिवसापूर्वी घरफोड्या झाल्या  आहेत. दादा, डॉन अशी नावे असलेल्या रिकाम्या टेकड्या गुंडाची दादागिरीची केंद्रे बनली आहेत.येथे  चोरीची वाहने आणून  नशापान करणे,रिकाम्या प्लॉटमध्ये पार्किंग करणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत.


रात्री अपरात्री कॉलनीतील 

रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या बाबतीत अनेक दादागिरीचे प्रकार घडत आहेत. मोबाईल हिस्कवणे, खिशातील पैसे काढून घेणे, दागिने हिसकावून पोबारा करणे, दमदाटी करणे असे प्रकार वाढले आहेत. याला पायबंद घालावा अशी मागणी येथील नागरिक, महिला युवती यांच्या मधून होत आहे.


नागरिकांच्या प्रतिक्रिया

*या भागामध्ये रहिवाशी क्षेत्र विस्तार करत असताना पायाभूत सुविधा आजवर मिळाल्या नाहीत.प्रवेश द्वाराजवळ व इतरत्र खुली जागा असल्याने ओपन बार सुरू आहेत.दारूच्या बाटल्यांचा खच अवतीभवती पडला आहे.रात्री अपरात्री दुचाकी,पायी जाणाऱ्या महिला व नागरिकांवर रस्त्यात अडवून मोबाईल, दागिने,पैसे हिसकावणे,बेदम मारहाण करणे असे प्रकार पोलीस वसाहतीच्या कुंपणात  घडत आहेत.

   - अजय देवकुळे स्थानिक नागरिक


*गेली १५ वर्षे या भागात राहते.लहान मुली, युवती यांचे संरक्षण भुरट्या गुंडांच्या मुळे दुरावले आहे.या भागात cctv नसल्याने ७ च्या आत घराची वाट धरावी लागते.या भागातील वाढती गुंडगिरी लक्षात घेऊन पोलिसांनी गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा.

   जाहिदा रहमान महिला पसरीचा नगर


*कॉलनीत जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. वास्तवात संवेदनशील असलेल्या या भागात २० ते ४० वयोगटातील भुरट्या गुंडांचा वावर इथे राजरोसपणे सुरू आहे.अंधाराचा फायदा घेऊन अनेक अवैध धंदे राजरोसपणे चालतात.निवासी घरासमोर मद्यप्राशन,नशापान हे प्रकार नित्याचेच आहेत.या गैरकृत्याना अटकाव करण्यासाठी काही रहिवाशी नागरिकांनी प्रयत्न केला तर त्यांच्यावरच जीवघेणे हल्ले,मारहाण झाली आहे.नागरिकांची सामाजिक,वैयक्तिक सुरक्षा कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी त्वरित ठोसकार्यवाही करावी.


मारुती फाळके 

स्थानिक नागरिक


*१२ एकर मध्ये पसरीचा नगर विखुरलेले आहे.सध्या पथदिवे बसवले आहेत.आगामी काळात रस्ते,पाणी,वीज या सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशिल आहे. या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी cctv, पिण्याचे पाणी ,रस्ते,महिला सुरक्षा यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर आराखडा तयार केला आहे., महिलांची सुरक्षा व गुंडगिरीला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर ठोस कार्यवाही केली जाईल.-- 

उत्तम आंबवडे सरपंच उजळाईवाडी

Post a Comment

0 Comments