वैष्णवी हुदलेचे चित्रकला ग्रेड परीक्षेत कोल्हापूर जिल्हात ४ था तर महाराष्ट्रात राज्यांत ९३ वा क्रमांक.
वैष्णवी हुदलेचे चित्रकला ग्रेड परीक्षेत कोल्हापूर जिल्हात ४ था तर महाराष्ट्रात राज्यांत ९३ वा क्रमांक.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गांधीनगर प्रतिनिधि
-------------------------------
उजळाईदेवी विद्या मंदिर हायस्कूल इ. दहावीत शिकणारी वैष्णवी अमोल हुद्दले हिने महाराष्ट्र शासन ,कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, शासकिय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड) चित्रकला ग्रेड परीक्षा ऐ ग्रेड सहित कला गुणवत्ता यादी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४था तर महाराष्ट्र राज्यात ९३ वे स्थान मिळवले...
या परीक्षेसाठी राज्यातून 3 लाख विद्यार्थी सहभागी होतात.या 3 लाख विद्यार्थीमधून शंभर विद्यार्थि कला गुणवत्ता यादी साठी निवडले जातात. या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, यांच्यासह आई- वडील व कला शिक्षक उत्तम शिंदे (सर) यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील यशा बद्दल वैष्णवीचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment