Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महापुरुष्यांचे प्रतिमा अनावरण सोहळा संपन्न.सर्वधर्म समभाव काळाची गरज -तुळशीदास झुंजुरकर.

 प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महापुरुष्यांचे प्रतिमा अनावरण सोहळा संपन्न.सर्वधर्म समभाव काळाची गरज -तुळशीदास झुंजुरकर.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चांदुर प्रतिनिधी

सुयोग गोरले

-----------------------------

चांदुर बाजार/--प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ दस्तगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विववेकानंद यांच्या फोटो भेट देऊन अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला गावातील नागरिक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात फोटो ची पूजन व हार अर्पण करून करण्यात आली 

  तरुणाई वाईट दिशेने भरकटत आहे समाजात अनिष्ट चालीरीती वाढत आहे,जातीजातीत समाज विखुरला जात आहे,म्हणून आता सर्वधर्म समभाव जोपासणे हि काळाची गरज आहे व ती सर्वांनी अंगिकारवावी असे मत महाराष्ट्र सोशल फोरमचे प्रवक्ता तुलसीदास झुंजुरकर यांनी फोटो अनावरण प्रसंगी व्यक्त केले. 

         महापुरुष्याना जातीच्या चौकटीतच बांधून ठेऊ नये,आता जाती धर्माच्या पलीकडे समाजकारण व्हावे.आणि थोडा तरी वेळ समाजकारणाची द्यावा असे मत आरोग्य निरीक्षक तथा महाराष्ट्र सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष धर्मा वानखडे यांनी व्यक्त केले. 

         कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आरोग्य समिती सदस्य माधुरी दुधे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य समिती सदस्य गीता गुल्हाने व प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रफुल्ल मरस्कोल्हे,लोकमत चे राहुल चौधरी हे होते. 

             महापुरुष्याची प्रतिमा धर्मा वानखडे, प्रमोद टेंबरे,सुनीता मेश्राम,संचाली दानवे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मा वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ वीरेंद्र नारनवरे, गजानन सोनोने,दिनेश आठवले,संचिता बढिये,विद्या वाणी, विमल मोहोड,यांनी अथक परिश्रम घेतले, जय जय महाराष्ट्र माझा या स्फुर्तीगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments