Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आरटीआय कार्यकर्त्याचा निघृण खून,मृतदेह गाडीतच सोडून मारेकरी फरार ; गुन्हेगारांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

 आरटीआय कार्यकर्त्याचा निघृण खून,मृतदेह गाडीतच सोडून मारेकरी फरार ; गुन्हेगारांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान.

    शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नांदणी - भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सी जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडीत आरटीआय कार्यकर्ते संतोष कदम व व ३५ या युवकाच्या शरीरावर,पोटावर धारधार शस्त्राने  वर्मी घाव करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे.

       या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. तसेच इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाणे चे अधिकारी  घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान चारचाकी गाडी सांगली येथील असून युवकाचा खून करून त्याचा मृतदेह गाड़ीतच ठेवून मारेकरी पसार झाले आहेत.         खून कोणी आणि का केला? याचा तपास कुरूंदवाड पोलीस करीत आहेत 

      घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मार्गावरील रस्त्याकडे लाल निळ्या कलरच्या चार चाकी गाडी थांबलेली गाडीमध्ये संतोष कदम  या युवकाचा   निर्घृण खून करून मृतदेह गाडीतच ठेवला होता गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला आहे.मृतदेह चार चाकी गाडीतच सोडून मारेकरी फरार झाले असून पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली व घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. या मार्गावर खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी होत आहे.

Post a Comment

0 Comments