Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डी.सी.नरके मँरेथॉन मध्ये मानवाडकर व स्वराज पाटील विजयी १९२ स्पर्धकांचा सहभाग

 डी.सी.नरके मँरेथॉन मध्ये मानवाडकर व स्वराज पाटील विजयी १९२ स्पर्धकांचा सहभाग.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

--------------------------------

कोपार्डे - कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व डीसी नरके यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत २१ किमी अंतराच्या खुल्या गटात राधानगरीच्या चंद्रकांत मानवाडकर यांनी १ तास २० मिनिटांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मानवाडकरला अध्यक्ष माजी आ. चंद्रदीप नरके व गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते ९ हजार रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

    शनिवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला कार्यस्थळ ते पाडळी खुर्द दरम्यान ही स्पर्धा झाली खुल्या गटात धनाजी गुरखे(म्हासुर्ली)याने १ तास २२ मिनिटांची वेळ नोंदवली. त्याला ७ हजार रोख चषक तर प्रणव पाटील (चंदगड)याने १ तास २७ मिनिटांची वेळ नोंदवून तिसरा क्रमांक मिळवला. त्याला ५ हजार रोख व चषक तर उत्तेजनार्थ रामदास हजारे याने १ तास ३७ मिनिटाची वेळ नोंदवली. त्याला ५ हजार रूपये रोख बक्षीस देण्यात आले. 

    १४ वर्षाखालील सबज्युनिअर गटात ५ किमीचे अंतर राधानगरीच्या स्वराज्य पाटील याने १८ मिनिट ४९ सेकंदात पार केले व प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख ५ हजार रूपये व चषक देण्यात आला.आयर्न पाटील (निगवे खा।) यांने २० मिनिटे १सेकंद वेळे नोंदवून दुसरा क्रमांक पटकावला आकाश जाधव (सावरवाडी) यांने २०.५३ मी. वेळेचे नोंद करून तिसरा क्रमांक पटकावला. त्याला ४ हजार रुपये रोख व चषक देण्यात आले. तर शिवराज चौगुले सावरवाडी यांने २१.२५ वेळेची नोंद करून उत्तेजनार्थ विजेतेपद मिळवले.

     शनिवारी स्व डी. सी. नरके यांच्या मूर्ती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कुंभी कासारी सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या समोर असलेल्या नरके यांच्या पुतळ्यास बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे डी.सी.नरके विद्यानिकेतन येथे प्रवचन ठेवण्यात आले होते. आज दिवसभर डी.सींच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम पार पडले.

Post a Comment

0 Comments