गांधीनगर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट.संरपंचासह ग्रामपंचायत सुस्त.
गांधीनगर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट.संरपंचासह ग्रामपंचायत सुस्त.
------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
गांधीनगर मध्ये बाजार पेठ मध्ये असलेल्या पोस्ट आफिस कार्यालयाच्या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका महिला व कामाला जात असलेल्या शिवाजी यशवंत बुचडे व व 46.याच्या मांडीचा चावा घेतला व त्यांना जखमी केलं.
बुचडे यांच्यावर उपजिल्हा शासकीय वसाहत रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य एका महिलेसह चौघांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला त्या पैकी दोघांना कोल्हापूर मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आजपर्यंत गांधीनगर मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या तडाख्यात 100 च्या वर ग्रामस्थ जखमी झाले असून सरपंच व ग्रामसेवक सदस्य मात्र निर्धास्त आहेत
या पिसाळलेल्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी गांधीनगर मधील ग्रामस्थांनी केली आहे
Comments
Post a Comment