नवोपक्रम स्पर्धेत गुडेवाडीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाचा राज्यात आठवा क्रमांक.
नवोपक्रम स्पर्धेत गुडेवाडीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाचा राज्यात आठवा क्रमांक.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------
गुडेवाडी (ता.चंदगड) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित गुडेवाडीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक एल.पी. पाटील यांनी सादर केलेल्या स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल या उपक्रमाला राज्यात आठवा क्रमांक मिळाला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती निर्माण करण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन करते. पहिल्या फेरीमध्ये जिल्हास्तरावर मूल्यांकन करून प्रथम पाच उपक्रम राज्यस्तरावर पाठविले जातात. दुसऱ्या फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट दहा नवोपक्रम निवडले जातात. तिसऱ्या फेरीतील सादरीकरणावरून गुणाानुक्रम ठरविले जातात. यावर्षी पुणे येथे पार पडलेल्या तिसऱ्या अंतिम फेरीमध्ये एल.पी. पाटील यांच्या नवोपक्रमाला आठवा क्रमांक मिळाला.
यापूर्वीही पार पडलेल्या नवोपक्रम स्पर्धेत भरीव कामगिरी करत पाटील यांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे. पाच जिल्हास्तरीय तीन राज्यस्तरीय क्रमांक पटकावत नवोपक्रम स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. पर्यावरण पूरक गणपती विसर्जन, शाळा परिसरातील पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, दैनंदिन पट लिहू झटपट, सीड बॉल, बटरफ्लाय गार्डन यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम पाटील हे विद्यालयात राबवत आहेत.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ नेहमीच पुरोगामी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी शिक्षक, विद्यार्थी, समाज यामध्ये प्रबोधनाचे कार्य करीत आहे. पाटील यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्षा सरोज पाटील, सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांनी अभिनंदन केले. शाळा समितीचे अध्यक्ष निंगाप्पा आवडण, विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.व्हि. गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment