हद्दपार आदेशाचे भंग केल्या प्रकरणी कन्हैय्या उर्फ, अमित सुनील साळुंखे याच्यावर बोरगावं पोलिसांनी केली कारवाई.
हद्दपार आदेशाचे भंग केल्या प्रकरणी कन्हैय्या उर्फ, अमित सुनील साळुंखे याच्यावर बोरगावं पोलिसांनी केली कारवाई.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------
दि.14/02/2024 रोजी दुपारी 4.30 वा. चे सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना हद्दपार इसम नामे कन्हैया उर्फ अमित सुनील साळुंखे वय 26 वर्ष राहणार नागठाणे ता.जि. सातारा हा मौजे नागठाणे गावचे हद्दीत रोडवर बसस्टॉप जवळ तो त्याच्या जवळ असणाऱ्या काळया रंगाची स्प्लेंडर दुचाकी वरून जात असताना मिळून आला. त्यास दोन वर्षाकरिता सातारा जिल्हा हद्दपार केले असतानाही हद्दपार आदेशाचा भंग करून सातारा जिल्हा हद्दीत प्रवेश करून मौजे नागठाणे येथे वास्तव करीत असल्याने बोरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 78/2024 म.पो.अधि.1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे
सदर कारवाई मध्ये पो.हवा.दादा स्वामी पो.हवा.दिपक्कुमार माडवे पो.ना. प्रशांत चव्हाण पो.काँ.केतन जाधव चालक -दादा माने यांनी सहभाग घेतला
सदर कारवाई बोरगावं पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.आर.जी. तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
Comments
Post a Comment