तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींसह पालकांनी लैंगिकता साक्षर होणे आवश्यक : गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे.
तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींसह पालकांनी लैंगिकता साक्षर होणे आवश्यक : गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भुदरगड प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
----------------------------------
गारगोटी हायस्कूलमध्ये 'तारुण्यभान' कार्यशाळा संपन्न
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनी व माता पालकांसाठी 'तारुण्यभान' (किशोरवयीन मुलीचे समुपदेशन) या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले होते
लैंगिक निरक्षरतेमुळे तारुण्यातील उमेदीचा काळ वाया जाऊ शकतो त्यामुळे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे यांनी केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
यावेळी बोलताना श्री.दीपक मेंगाणे म्हणाले, तारुण्य वयात मैत्री, प्रेम, शारिरीक व मानसिक बदल समजून घ्यायला हवेत. लैंगिक आकर्षणातून कळत नकळत अनेक समस्या निर्माण होतात, अशा समस्यांमुळे ऐन तारुण्यातील उमेदीचा काळ वाया जाऊ शकतो.
सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. पण पहिल्यांदाच याविषयी माहिती घ्यायला हवी. या सर्व विषयांवर दिलखुलास संवाद साधण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री.मेंगाणे यांनी वाढीची अवस्था, वयात येतानाचे मुला मुलीतील शारीरिक, भावनिक बदल, संप्रेरकांचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम, प्रेमाबाबत मुला-मुलींचे भिन्न दृष्टिकोन, आकर्षण आणि प्रेम यातील फरक, बेजबाबदार लैंगिक वर्तन, आई वडील व शिक्षकांनी मुलांशी संवाद साधण्याची आवश्यकता आदी विषयाबाबत पॉवरपॉइंट सादरीकरण, मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रप्रमुख संजय कुकडे, यांच्यासह माता पालक, शिक्षक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment