मांडुळची एक कोटी दहा लाख किंमतीला तस्करी करण्यासाठी घेवुन जाणा-या टोळीस अटक. तळबीड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

 मांडुळची एक कोटी दहा लाख किंमतीला तस्करी करण्यासाठी घेवुन जाणा-या टोळीस अटक. तळबीड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

-----------------------‐---------‐‐-------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी 

वैभव शिंदे

------------------------------------------------

     मा. पोलीस अधिक्षक सातारा व अप्पर पोलीस अधिक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी अगामी येणारी शिवजयंती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने हायवेला सक्त पेट्रालिंग करण्याचे सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे काल दि- १६/०२/२०२४ रोजी सायंकाळी तळबीड पोलीस ठाणे कडील स्टाफ पेट्रालिंग करीत असताना स.पो.नि भोसले व पो.कॉ-निलेश विभुते यांना खात्रीशिर माहीती मिळाली की, कराड ते सातारा जाणारे हायवे वरती मौजे चराडे या गावमध्ये जय शिवराय हॉटेल जवळ काही लोक बेकायदेशीर सर्प जातीची मांडुळ विक्रीसाठी घेवुन येणार आहेत अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने तळबीड पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफने यांनी जयशिवराय हॉटेल आजुबाजुस सापळा लावुन वॉच करीत असताना रात्रौ ९.०० वा. चे. सुमारास तीन इसम मोटार सायकलवरुन जय शिवराय हॉटेल समोरील रिकाम्या जागेत येवुन थांबले होते. त्याच्या हालचाली संशयीत वाटल्याने व बातमीदाराने दिलेल्या वर्णना प्रमाणे त्यांचे वर्णन होते. म्हणून तळबीड पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफने त्यांना घेराव घालुन ताब्यात घेवुन नांव पत्ता विचारता त्यांचे नांव १) रुपेश अनिल साने वय-२५ रा. आड ता. पोलादपुर जि. रायगड २) अनिकेत विजय उत्तेकर वय-२७ रा कापडखुर्दे ता. पोलादपुर जि. रायगड ३) आनंद चंद्रकांत निकम वय-३५ रा. कापडखुर्दे ता. पोलादपुर जि रायगड असे सांगितले त्यांचे जवळील एका पुठ्ठयाच्या बॉक्सची तपासणी केली असता. त्यामध्ये सर्प जातीचे मांडुळ मिळुन आले. सदर बाबत वराडे येथील वनपाल सागर कुंभार यांनी मांडुळ असल्याचे खात्री करुन सांगितली. त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी मांडुळ हे आनंद चंद्रकांत निकम यांस शेतात काम करीत असताना दहा दिवसापर्वी मिळुन आले. असुन ते आम्ही एक कोटी दहा लाख रुपये या किंमतीला विक्रीसाठी घेवुन जात होतो. त्या तिघांविरुद्ध तळबीड पोलीस ठाणेस वन्यजीव प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करणेत आला असुन त्यांना अटक केली आहे.व वनपरिक्षेत्र अधिकारी कराड यांचे कडे सुरक्षेतेच्या दृष्टीने सदरचे मांडुळ त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. अटक आरोपी यांचेकडे अधिक तपास चालु आहे. 

      सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, मा अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री किरण भोसले, पो.उ.नि अशोक मदने तळबीड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस फौजदार काळे, खराडे पोहेकों/आप्पा ओंबासे/पो. ना भोसले, संदेश दिक्षीत, पो.कॉ. निलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे यांनी केली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.