विचारांचे ऐश्वर्य लाभलेले ओझरे गाव -डॉ यशवंत पाटणे.

 विचारांचे ऐश्वर्य लाभलेले ओझरे गाव -डॉ यशवंत पाटणे.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत        

----------------------------------             

  - ओझरे ग्रामस्थांकडून सार्वजनिक वाचनालय स्थापन करण्यात आले . जीवनात चांगला विचार व आचार आणि संस्कार वाचनातून समृद्ध होत असतो युवा पिढीला वाचन संस्कृतीच्या माध्यमातून समृद्ध होण्यासाठी " वाचाल तर वाचाल " याचं महत्व जाणून ओझरे गावातील तरुण व जेष्ठ नागरिकांनी एकत्र येत गावात एक सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परिक्षा अभ्यासिका सुरू केली . गावकऱ्यांच्या या विधायक भूमिकेने वाचन संस्कृतीला बळ मिळत असून त्यांचा हा उपक्रम इतर गावातील ग्रामस्थाना एक दिशादर्शक आर्दश घालून दिला आहे .

     ज्ञान प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका निर्माण होण्याचा निश्चय केला आणि बघता बघता पाच लाख तीस हजार रुपये ( ५ 030000 ) देणगी जमा झाली ' ग्रथ , व्यवसायिक पुस्तके , कादबऱ्या , कथा लेखन , कायदा माहिती पुस्तिका , स्पर्धा अभ्यासिका पुस्तक अशा अनेक प्रकाचे पुस्तके देणगी स्वरूपात जमा झाली .

आमदार छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते वाचनालयाचा शुभारंभ झाला . यावेळी जेष्ठ साहित्यक प्रा . डॉ . यशवंत पाटणे , जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे , प्रतापगड साखर कारख्यानाचे चेअरमन सौरभ शिंदे , तहसिलदार - हणमंत कोळेकर ' , गटविकास अधिकारी मनोज भोसले , सतीश बुद्धे साहेब . सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष तासगावकर , गट शिक्षणधिकारी संजय धुमाळ ' उमेश भोसले शरद राठी , सागर खेडीकर आणि ओझरे ग्रामस्थ व महिला मंच उपस्थित होते .

सुरुवातीला सपूर्ण ओझरे गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आणि संपूर्ण दिंडीत महिला वर्ग विविध वेशभूषा करून आल्या होत्या विविध प्रकारचे नृत्य कला सादर केल्या त्यात युवा वर्ग हि सहभाग दिसत होता . संपूर्ण दिंडीत छ . शिवाजी महाराजाच्या वेशभूषातील मा . दळवी यांनी लक्ष वेधून घेतले .

डॉ यशवंत पाटणे सर आपल्या व्याख्यानात म्हणाले कि आपट्याच्या पानाने दसरा उत्सव साजरा करतो . आब्यांच्या पानांनी पाडवा उत्सव साजरा करतो पुस्तकांच्या पानांनी ज्ञान उत्सव साजरा करा . पुस्तकच आपले मन प्रसन्न करते . पुस्तकांमुळेच ज्ञान वाटत जाते आपले जीवन सुखी व समृद्ध होते . लक्ष्मीबाईच्या दागिन्यामुळे रयत शिक्षण संस्था उभी राहिली . बहिणीच्या दागिन्यामुळे डॉ अब्दुल कलाम निर्माण झाले . डॉ कलाम आपल्या बहिणीला म्हणाले कि मी मोठा झालो कि तुझे दागिना दुप्पट करून देतो त्यावर बहिणीने सुंदर उत्तर दिले कि " माझे दागिना परत दुप्पट देण्यापेक्षा तुम्ही इतके मोठे व्हा कि तुम्ही भारत मातेच्या गळ्यातील दागिना बना "असे अनेक किस्से डॉ पाटणे सरांनी माडले . पुस्तक व वाचन यांचा संबंध मानव जातीस किती वरदान आहे हे पटवून दिले

जेष्ठसाहित्यक डॉ यशवंत पाटणे साहेबांनी ओझरे वाचनालयास पन्नास पुस्तके भेट दिली .

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री प्रमोद इंगुळकर सर यांनी केली तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री अशोक लकडे सर यांनी करून दिला व आभार मानले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.