Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

इस्रो भेटीसाठी जाणाऱ्या वसुंधरा सावंत हीचा सत्कार ग्रामस्थांच्या शुभेच्छा.विमानाने जाणार इस्त्रोला.

 इस्रो भेटीसाठी जाणाऱ्या वसुंधरा सावंत  हीचा सत्कार ग्रामस्थांच्या शुभेच्छा.विमानाने जाणार इस्त्रोला.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

उचगाव ता उचगाव येथील वसुंधरा विशाल सावंत ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवी आली अशा एकूण 17 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना विमानाने इस्त्रोला भेट  घडवून आणण्याचे नियोजन महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी केले त्यानुसार टेंबलाईवाडी विद्या मंदिर मध्ये शिकणाऱ्या वसुंधरा सावंत हिला उचगाव ग्रामस्थांतर्फे सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या 

इस्त्रोला भेट देणारी उचगाव मधील पहिलीच विद्यार्थिनी म्हणून तिचे सर्वांनी कौतुक केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या


 उचगाव मंगेश्वर मंदिर परिसरात कार्यक्रम पार पडला 

यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच सारिका माने तंटामुक्त समिती अध्यक्ष उमेश पाटील दिनकर पोवार छत्रपती सोसायटी चेअरमन संजय चौगुले( वतनदार) मनसे तालुकाप्रमुख अभिजीत पाटील शिवसेना उचगाव प्रमुख दीपक रेडेकर कमर्शियल बँक संचालक राजु संकपाळ सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाइंगडे ग्रामपंचायत सदस्य राहुल मोळे संदीप कुंभार विराग करी अरविंद शिंदे जयसिंग ढेकळे पोलीस पाटील स्वप्नील साठे टेंबलाईवाडी शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे  उचगाव च्या मुख्याध्यापिका कांता बाउचकर महादेव चव्हाण  प्रमोद ढेकळे व सावंत परिवार ग्रामस्थ  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

उचगाव

वसुंधरा सावंत हीचा सत्कार करताना  सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच सारिका माने उमेश पाटील स्वप्नील साठे राहुल  मोळे व अन्य मान्यवर

Post a Comment

0 Comments