नांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी बुथ कमिटी ची बैठक- आ. हंबर्डे.
नांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी बुथ कमिटी ची बैठक- आ. हंबर्डे.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
-------------------------
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ कमिटीची आढावा बैठक
बुधवार, दि 07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वा. मातोश्री मंगल कार्यालय. कौठा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे
या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ. अमर भाऊ राजूरकर. माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,माजी महापौर अब्दुल सत्तार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक असून बूथ अध्यक्ष, बुथ प्रमुखं,बुथ सोशल मीडिया, बी.एल.ये. यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन आ.मोहनराव हंबर्डे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.कविता कळसकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शमीम अब्दुल्ला, शहर ब्लॉक कमिटी अध्यक्ष किशोर स्वामी, दक्षिण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, महिला शहर अध्यक्षा डॉ.सौ.ललीता बोकारे, दक्षिण युवा अध्यक्ष नितीन पाटील झरीकर, सिडको ब्लॉक कमिटी अध्यक्ष सतीश बसवदे,तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख असलम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment