वळीवडे रोडवर दोन टू व्हीलर गाड्यांची समोरासमोर धडक. एक जण गंभीर जखमी.
वळीवडे रोडवर दोन टू व्हीलर गाड्यांची समोरासमोर धडक. एक जण गंभीर जखमी.
----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------------
काल दिनांक 8 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास बबन साळुंखे हे आपल्या अक्टिवा गाडी क्रमांक MH.09.cs.6229 पत्नीसह भाजीपाला विकण्यासाठी वळिवडे येथून गांधीनगर मध्ये येत असताना राधास्वामी बस स्टॉप जवळ आले असता प्रशांत रणदिवे MH ,09.GD 4627 या पल्सर मोटार सायकल वरुन गांधीनगर कडून वळिवडे कडे निघालेल्या मद्यधुंद मोटार सायकल चालकाने बबन साळुंखे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली या झालेल्या अपघातात साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कोल्हापूर मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत
या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत
Comments
Post a Comment