Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुणबी मराठा महासंघ लोहा तालुकाध्यक्ष पदी अंबादास पाटील पवार यांची निवड.

 कुणबी मराठा महासंघ लोहा तालुकाध्यक्ष पदी अंबादास पाटील पवार यांची निवड.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

------------------------------

लोहा,मागील अनेक कालावधीपासून सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारी संघटना म्हणून "कुणबी मराठा महासंघा"कडे पाहिले जाते. संघटनेची विचारधारा आणि तत्वप्रणाली तळागाळात पोहचवून कुणबी मराठा समाजातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी महासंघ काम करते. कुणबी मराठा महासंघाचे प्रमुख नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास पाटील पवार यांची लोहा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मनिष वडजे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बालाजीराव मिरकुटे, युवा जिल्हाध्यक्ष माधवराव पवळे, जिल्हा सरचिटणीस अनिल व्यवहारे यांच्यासह नागनाथराव पाटिल चुडावकर, अरुण पाटिल इंगोले, अक्षय पाटिल चव्हाण सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments