Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत आसलेल्या EVM मशीन डेमो संदर्भात जनतेचा विरोध, नेरूळ बी विभागात घडलेला प्रकार उघडकीस.

 नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत आसलेल्या EVM मशीन डेमो संदर्भात जनतेचा विरोध, नेरूळ बी विभागात घडलेला प्रकार उघडकीस.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नवी मुंबई प्रतिनिधी 

रवि पी. ढवळे 

----------------------------

 नेरुळ :=महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रत्येक विभागात जाऊन EVM मशीन संदर्भात नागरिकांना डेमो दाखवण्यात येत आहेत, परंतु काही ठिकाणी नागरिकांना डेमो न दाखवता कसलीच माहीती न देता जे नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचारी स्टाफ आहेत त्यांच्याच सह्या घेऊन या मशीनसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आसे खोटे नाटे दाखवून काही अधिकारी चुकीचा रिपोर्ट बनवून महाराष्ट्र शासन, निवडणूक अयोगाला रिपोर्ट सादर करत आहेत हे साफ चुकीचे आहे. हा प्रकार नुकताच नेरूळ बी विभाग नवी मुंबई महानगरपालिकेत घडला आहे . त्यानंतर जि. प. शाळा क्रमांक 15 शिरवणे विद्यालय या ठिकाणी EVM चा डेमो दाखवत आसताना वंचित बहुजन अघाडी सह रिपब्लिकन सेना आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी धाव घेऊन या EVM मशीनला विरोध केला.

" EVM हटाव देश बचाव चा नारा बुलंद केला..! तरी नवी मुंबईतील सुजान नागरिकांनी आपल्या विभागात हे अधिकारी येतील तेंव्हा स्वतःहा कोठेच सह्या न करता आपण EVM हटाव देश बचाव...साठी आपला रोष व्यक्त करून EVM ला विरोध करावा. आसे जाहीर अव्हान करण्यात आले. त्या वेळी वंचित बहुजन अघाडी बेलापूर तालुका माजी उपाध्यक्ष कल्याणराव हनवते, वंचित चे नेरूळ विभाग माजी उपाध्यक्ष अशोक साळवे,पञकार संजय पवार, रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र लगाडे, कामगार युनियन जिल्हाध्यक्ष कोंडीबा हिंगोले इत्यादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून EVM मशीनचा जाहीर निषेध करून आपला रोष व्यक्त केला. व शेवटी निवडणूक अधिकारी नारायण पाईकराव यांना उपस्थितांच्या वतीने जाहीर निषेध निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments