नायब तहसीलदार यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पी एन 5139 तालुका जावली यांचे पदाधिकारी

 नायब तहसीलदार यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पी एन  5139 तालुका जावली यांचे पदाधिकारी,

प्रतिनिधी शेखर जाधव  

भणंग :- महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पी एन 5139 तालुका जावली च्या वतीने मरडमुरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी ज्ञानेश्वर तात्याबा मर्ढेकर यांना वसुलीचे काम करत असताना मारहाण झाले प्रकरणी सदर कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 5139 च्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती जावली मेढा, तहसील कार्यालय मेढा, पोलीस ठाणे मेढा, व ग्रामपंचायत मरडमुरे यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले....

सदरची बाब ही अतिशय गंभीर असून याबाबतीत प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन पीडित कर्मचाऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.. 

गेली जवळजवळ महिनाभर हा कर्मचारी न्याय मिळण्यासाठी वन वन भटकत असून अद्याप प्रशासनाकडून कोणतीही हालचाल केली गेली नाही. सदरच्या कर्मचाऱ्याला न्याय मिळेपर्यंत संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांच्याकडून देण्यात आली.. यावेळी सं. अध्यक्ष पंढरी मर्ढेकर, रा. सदस्य. दीपक जाधव. रा. सचिव. ओमकार चिकणे जिल्हा संघटक. जितेंद्र कदम तालुका कोषाध्यक्ष. प्रकाश भोंडे व इतर सदस्य उपस्थित होते...

मुळातच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ज्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाहीत आणि आता.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी गाव पातळीवर अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. गावच्या राजकारणाचा फटका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नाहक बसताना दिसत आहे. यामध्ये कुठेतरी अपेक्षित बदल होन गरजेच आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून व शासनाकडून ठोस उपाययोजना होणे अतिशय गरजेचे आहे. तरच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर करत असलेल्या कामाची पोचपावती मिळेल.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.