Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

57 लाख 18 हाजार 371 रुपयाची फसवणूक करणाऱ्या 23 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

57 लाख 18 हाजार 371 रुपयाची फसवणूक करणाऱ्या 23 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------------------

 कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या माया चेंबर्समध्ये युनियन बँकेची मुख्य शाखा आहे. या शाखेत सोनं गहाण ठेवून कर्ज दिलं जातं. त्यासाठी बँकेनं शुक्रवार पेठेतल्या धनवडे गल्लीतील सागर कलघटगी याची व्हॅल्युएटर म्हणून नियुक्ती केली होती. त्यानं बँकेच्या अधिकार्‍यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सागर कलघटगी यानं बँकेतील अधिकार्‍यांचा विश्वासघात करून, सोनेतारण कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींशी संगनमत केलं. खोटे जिन्नस तारण घेवून, खरे जिन्नस असल्याचा मुल्यांकन दाखला बँकेकडं देवून, त्यावर कर्ज उचलली. तसंच काही ठिकाणी बनावट सोने जिन्नस तयार करून ते बँकेकडं गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलली. ही बाब बँकेतील मॅनेजर दिपककुमार साह यांच्या लक्षात आली. त्यांनी या प्रकरणी लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक दिलीप पोवार यांना हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सागर कलघटगी, सतिश पोतदार, रजनिकांत वडगावकर, युवराज बसुगडे, रोहीणी पाटील, उर्मिला पाटील, मारूती कोल्हटकर, स्वालिया सरकवास, सतिश कांबळे, असिफ सरकवास, यश भुते, उज्वला रणवरे यांच्यासह २३ जणांवर तक्रार दिल्यानं या सर्वांच्या विरोधात ५७ लाख १८ हजार ३७१ रूपयांची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा नोंद झाला. यानंतर ताबडतोब हालचाली करून पोलिसांनी मध्यरात्री बँकेचा व्हॅल्युएटर सागर कलघटगी, श्रावण हळदणकर, गोपिनाथ शेडगे, ओंकार शिंदे, सुजल शिंदे, तुषार जाधव यांना अटक केली. त्यांना न्यायालयानं -दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय.

Post a Comment

0 Comments