गडमुडशिंगी भाकणूक चांगल्या पर्जन्याच्या भाकिताने शेतकरी सुखावला.
गडमुडशिंगी भाकणूक चांगल्या पर्जन्याच्या भाकिताने शेतकरी सुखावला.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
उजळाईवाडी प्रतिनिधी
--------------------------------
उजळाईवाडी ता १
यावर्षी चांगले चांगले पर्जन्यमान होणार असून पीक पाणीही उदंड होण्याचे भाकीत गडमुडशिंगी येथील धुळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळ यात्रेतील भाकणुकी मध्ये वाशी येथील देवॠषी भगवान पुजारी व गडमुडशिंगी येथील गणपती पुजारी यांनी आपल्या भाकणुकीमध्ये स्थानिक ते जागतिक संभाव्य घडामोडींचे भाकीत आपल्या भाकणुकीमध्ये वर्तवले .भाकणूक गुढ भाषेत सांगितली जाते. जुनी जाणती लोक याचे आपल्या परीने उकल करीत असतात. त्यापैकी
'मेघाची कावड उदंड हाय' याचा अर्थ चांगले पर्जन्यमान होणार असल्याचे सांगितले जाते.
पांढरीचे रक्षण करीन, बाळ गोपाळ यांना सुरक्षित ठेवीन व रोगराई हटवीन याचा अर्थ पंचक्रोशी मध्ये शांतता व स्थैर्य नांदेल, तसेच भगवा जगावर राज्य करेल याचा अर्थ कोणी एक किंवा अनेक हिंदू व्यक्ती जगावर हुकूमशाही गाजवेल असा नसून उच्च मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार होऊन जागतिक शांतता व स्थैर्य नांदण्यासाठी जागतिक समूह भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर अंगिकार करतील असा असल्याचे सांगण्यात येते. तसेच देशा देशामधील संघर्षांमुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात
यावर्षी धुळसिद्ध बिरदेव रहिवासी त्रैवार्षिक जळ यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडले . यामध्ये रविवार ता २५ रोजी करसिद्ध माळीतून पालखीचे धुळसिद्ध बिरदेव मंदिरात आगमन, रात्री खनाची मेंढी व सोमवार ता 26 रोजी गुरु शिष्य भेट व 21 गावातील सुवासिनी पूजन करण्यात आले. मंगळवार ता 27 रोजी अभूतपूर्व उत्साहात जळ काढण्यात आला. या दिवशी डोळ्याचे पारणे फेडणारी आतिषबाजी करण्यात आली व नवीन तयार करण्यात आलेल्या रथातून कर हातात घेतलेल्या सिद्धांसह मोठ्या संख्येने ढोल कैताळांच्या निनादात जळविधी पार पडला. या जळविधीसाठी विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी यावर्षी प्रथमच पाहायला मिळाली.
बुधवार ता. 28 रोजी खाटीक बोनी, तर 29 तारखेला गाव बोनी ने संपूर्ण भक्त जणांकडून खारा नैवेद्य गोडा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला. शुक्रवार ता. १ रोजी आंबील बोनीने यात्रेची सांगता करण्यात आली.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून नेटके नियोजन
संपूर्ण यात्रेदरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेची व यात्रेतील सर्व दुकानांची व्यवस्था उत्तम राखण्यात आली होती व संपूर्ण गावात सर्व मंदिरांवर व शिवाजी चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच शिवाजी चौकातील कारंजाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या संपूर्ण याचा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गांधीनगर पोलिसांकडून विशेष परिश्रम घेण्यात आले . यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरपंच सौ अश्विनी अरविंद शिरगावे व राजाराम कारखान्याचे संचालक व उपसरपंच तानाजी कृष्णात पाटील ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी नेटके नियोजन केले होते .
Comments
Post a Comment