रिसोड तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय पशु पालकामध्ये भीतीचेे वातावरण.
रिसोड तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय पशु पालकामध्ये भीतीचेे वातावरण.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------------------
. शहरासह तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून यामुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसोड शहरासह तालुक्यात या अगोदर अनेक गाई, म्हशी, बैल चोरी झाल्याच्या घटना घडल्या असून याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे गुरांच्या किमती गगनाला पोचल्या असल्याने गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे बोलल्या जात आहे.दि. 22 मार्चच्या रात्री रिसोड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख यांच्या शेतातून दोन जनावरे तर त्यांच्या शेजारी असलेल्या शेतातून दोन गाई चोरी गेल्याच्याा घटना घडली.गुरे चोरणाऱ्या टोळीमुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Comments
Post a Comment