रिसोड येथे जागतिक वन दिन कार्यक्रमाचे आयोजन

 रिसोड येथे जागतिक वन दिन कार्यक्रमाचे आयोजन.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत  ठाकूर

-----------------------------------------------

संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वीवर राहणार्या लोकांमध्ये विभिन्न भाषा,त्यांचे धर्म-पंथ, खाण्या-पिण्याच्या सवयी ह्या मुळे जरी  मानवाचे विभाजन वेगवेगळ्या देशामध्ये झाले तरी निसर्गाचे नियम सर्वांकरिता समान आहेत. निसर्ग कोणत्याही जीवीत प्राण्यासोबत भेदभाव करत नाही.ह्याचं कारणास्तव वन दिनाला जेवढे महत्व आज भारत देशामध्ये आहे तेवढेच महत्व अमेरिका,फ्रान्स, रशिया इत्यादी पाश्चात्य देशामध्ये आहे,ह्या मध्ये दोमत नाही,असे मत "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी  वाशिम प्रादेशिक वनविभाग,वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक सी-187 रिसोड येथे आयोजित जागतिक वन दिनानिमित्त व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता एच. व्ही. साठे वनपाल, एम. एम. सरोदे, पी. आर. वानखेडे, एस. आर. शिंदे वनरक्षक प्रादेशिक वनविभाग वाशिम, वनपरिक्षेत्र रिसोड तसेच ज्ञानेश्वर मगर मुख्याध्यापक सिध्देश्वर विद्यालय रिसोड,विठ्ठल सारोळकर मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय रिसोड, मदन चौधरी मुख्याध्यापक जि.प. शाळा रामेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.जागतिक वन दिनाचे महत्व विशद करतांना मुलंगे पुढे म्हणाले की,स्वातंत्र्य समयी अर्थात 1947 ला भारताची लोकसंख्या केवळ 36 कोटी होती पण आजरोजी लोकसंख्येचा विस्फोट होऊन 139 कोटी पर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उद्योगधंदे, रस्ता रूंदीकरण, जलसिंचनाकरिता धरणे,आरोग्य सुविधा तसेच शैक्षणिक संस्थामध्ये भरमसाठ वाढ होऊन अब्जावधी देशी वृक्षांची कत्तल करण्यात आली.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी साधारणतः 33 % वनसंपदा असणे  अनिवार्य आहे पण आजरोजी फक्त 21% वनसंपदा उरली आहे हि फार चिंतनीय बाब आहे.त्यामुळे प्रत्येकाने कमीतकमी एक वृक्ष लावुन धरतीमातेला पुन्हा सौंदर्याचा अलंकार चढवावा अशी विनंती उपस्थितांना केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक अनंता मापारी,गुणवंत थोरात,वृक्षप्रेमी शंकर थोरात  तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.