५०० रुपयाची लाच स्वीकारताना महाविद्यालयीन कनिष्ठ लिपिकास अटक: परीक्षेचा निकाल दाखविण्यासाठी मागितली लाच.
५०० रुपयाची लाच स्वीकारताना महाविद्यालयीन कनिष्ठ लिपिकास अटक: परीक्षेचा निकाल दाखविण्यासाठी मागितली लाच.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गांधीनगर प्रतिनिधि
-------------------------
शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या न्यू लॉ कॉलेज,चित्रनगरी कोल्हापूर या लॉ कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारा आणि त्याने दिलेल्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणामुळे लागलेला नाही. त्याकरिता तक्रारदार हे लीपिकास भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांचा निकाल लागणेसाठी 500 रुपये फी द्यावे लागेल असे म्हणून आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 500/- ₹ लाच रक्कम मागणी करून आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून 500/-₹ लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध लाचलूचपत विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदरचे संशयित आरोपीचे सोपान धोंडीराम माने, (वय 54) वर्षे,(वर्ग_ 03) पद - कनिष्ठ लिपिक प्रशासन विभाग,न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ कोल्हापूर, रा.मसुटे कॉलनी प्लॅट नंबर 02 ए, सरनोबतवाडी, ता.करवीर,जि. कोल्हापूर, मुळ रा. नेवरी, ता.कडेगाव,जि. सांगली असुन त्यानी लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई मार्गदर्शन अधिकारी . श्री अमोल तांबे,(पोलीस अधीक्षक) लाप्रवि,पुणे, मा. डॉ.शितल जानवे, (अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि,पुणे.मा.श्री.विजय चौधरी.(अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि,पुणे.व पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बंबरगेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने पोलीस नाईक सचिन पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चौगुले यांनी केली.
Comments
Post a Comment