बामनोली गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर प्रादेशिक पर्यटन स्थळामध्ये समावेश केला.

 बामनोली गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर प्रादेशिक पर्यटन स्थळामध्ये समावेश केला.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कुपवाड बामणोली प्रतिनिधी 

राजू कदम

----------------------------

बामणोली. मा आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी बामनोली गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर च्या प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश केला व प्रादेशिक पर्यटन विभागामधून मंदिराच्या विकासासाठी 2 कोटी 38 लाख इतकी निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत बामनोली व श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या संचालकाच्या वतीने पुष्प हर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा प्रकाश ढंग भाजपा ज्येष्ठ नेते मा प्रकाश तात्या बिरजे गावच्या सरपंच सौ संगीता ताई चिंचकर, उपसरपंच विष्णू लोटे, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष सरगर, ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले , ग्रामपंचायत सदस्य अर्चना पाटील गीता पाटील सुनील पाटील उमेश वारंगल श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे संचालक रमेश शंकर रामशंकर संदीप शंकर उपस्थित होते. 


ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी भैरवनाथ मंदिरच्या प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी किरण भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.