Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या धाडसी रणरागिणी.

 गांधीनगर पोलीस ठाण्याच्या धाडसी रणरागिणी.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

----------------------------

प्रत्येक नारीला तिच्या कर्तुत्वाला तिच्या नेतृत्वाला तिच्या सहनशक्तीला तिच्या त्यागाला तिच्या प्रेमाला तिच्या मातृत्वाला माझा शतशः प्रणाम आज 8 मार्च जागतीक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सर्व भारतीय महिला माता भगीनीनां जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.महाराणी जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्या होळकर, कल्पना चावला, सिंधुताई सकपाळ, किरण बेदी,मदर तेरेसा, इंदिरा गांधी या महिलांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर इतिहास घडवला.

काही दिवसांपूर्वी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न एका अल्पवयीन मुलाने केला होता. तात्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील शंकर सुतार, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे उपनिरीक्षका तेजश्री पवार, महिला हवालदार सुवर्णा कांबळे, महिला कॉन्स्टेबल कुंदन काळे, निशिगंधा कुंभार हे कर्मचारी पोलीस ठाण्यात तैनात होते.

या घडलेल्या प्रकारामुळे सिंधी बांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या आवारात जमले. त्यावेळी पोलीस अल्पवयीन आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना अचानकपणे जमाव पेटला. अन् जमावातील काही लोकांनी त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलावर हल्ला चढवला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अल्प वयीन आरोपीला कोणत्याही प्रकारे इजा होऊ नये म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता कुंदन काळे व सुवर्णा कांबळे निशीगंधा कुंभार या तीन न महिला पोलिसांनी 

जमलेल्या गर्दीत घुसून त्या अल्पवयीन मुलांची जमावापासून सुटका करून त्या अल्पवयीन मुलास आपल्या ताब्यात घेतले. अशा धाडसी रणरागिणीना फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र दैनिक सुपर भारत परिवारातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा.

Post a Comment

0 Comments