Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथे जागतिक चिमणी दिवस कार्यक्रमाचे आयोजन.

रिसोड येथे जागतिक चिमणी दिवस कार्यक्रमाचे आयोजन.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

रिसोड  प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

--------------------------------

 ह्या पृथ्वीवर एक नाही तर अनेक लहान-मोठ्या आकाराचे,गरिब- हिंस्त्र,रंगीबेरंगी पशु- पक्षी विचरण करित आहेत.ज्याअर्थी ब्रम्हांडांनी त्यांना जन्माला घातले त्या अर्थी जगण्याचा जेवढा अधिकार मानवाला आहे तेवढाचं अधिकार पशु - पक्ष्यांना सुध्दा आहे हि बाब अधोरेखांकित करणे गरजेचे आहे. मनुष्याला घेऊन निसर्गाने पृथ्वी वरील सर्व जीव-जंतूना एका विशिष्ट प्रकारच्या अन्न साखळी मध्ये गुंफले आहे.पण अधिकाधिक सुख सोयी उपलब्ध करून घेण्याच्या नादात मानवाने निसर्गनिर्मित अन्नसाखळी मध्ये खंड निर्माण करण्याचा जणू काही चंग बांधला आहे,कि जो आपल्या भावी पिढीला फार घातक होऊ शकतो. असे मत "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" प्राप्त गजानन मुलंगे यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन श्रीसंत कबीर कुटी संस्थान रिसोड येथे करण्यात आले.कार्यक्रमाकरिता सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र रिसोड चे वनपाल विष्णू जटाळे,सौ.निर्मला दिघोळे तर वनरक्षक रमेश कदम तसेच सौ. जयश्री लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी एकुण पन्नास झाडांना खापरी येळण्या बांधुन पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.पृथ्वीवरील अनेक पशु-पक्ष्यांच्या विलुप्त होत चाललेल्या जातीबद्दल चिंता व्यक्त करतांना मुलंगे पुढे म्हणाले की,एकेकाळी आकाशाला गवसणी घालत स्वतःच्या पीलांवर नजर ठेवणारी घार,देव बाभळीच्या खोडाला वारंवार चोच मारणारा सुतार पक्षी, लहान-मोठ्या मृत जनावरांना काही तासांत फस्त करून परिसराला स्वच्छ ठेवणारा अवाढव्य गिधाड पक्षी आणि घराच्या अंगणात थव्याथव्याने धान्याचे दाणे टिपत लहान मुलांचे मनोरंजन करणारी चिऊताई आजरोजी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.असे जर झाले तर मानवाचे अस्तित्व सुध्दा धोक्यात येईल याची जाणं सुज्ञ नागरिकांनी वेळीचं घेऊन मानवी सुधारणे सोबतच पर्यावरणाची सुध्दा दखल घ्यावी असा मोलाचा सल्ला उपस्थितांना दिला. कार्यक्रमाकरिता सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी,शिक्षक गुणवंत थोरात,दिया बरडे, श्रावणी बरडे,कान्हा बरडे,टोलुआण्णा, विनायक ह्यांनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments