स्व. सावित्री थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्काराने सौ. रेखा वांगडे सन्मानित.

 स्व. सावित्री थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्काराने सौ. रेखा वांगडे सन्मानित.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

शेखर जाधव

--------------------------------------

वेदांत क्लासेस अँड अकॅडमीच्या संचालिका सौ. रेखा संजय वांगडे यांना महात्मा गांधी वाचनालयाचा स्व. सावित्री थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. आज रविवार दि.१७ मार्च रोजी या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. रेखा वांगडे यांनी वर्षभरात मृत्युंजय, ययाती, राधेय,युगंधर,प्रकाशवाटा,अस्तित्व,महाश्वेता, वाईज अँड अदरवाईज, द्रोपदी मुर्मू, परीघ, राऊ, श्रीकृष्ण, अग्निपंख, छावा अशी अनेक पुस्तके वाचनात आणली होती. संपूर्ण वर्षभराचा आढावा घेत महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांनी हा पुरस्कार जाहीर केला. रेखा वांगडे ह्या गेली अठरा वर्षे मेढा या ठिकाणी वेदांत क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानदानाचं काम करत आहेत.हे काम करत असताना त्यानी अनेक पुस्तके वाचनात आणली आहेत नुकत्याच झालेल्या आई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत वाचन प्रेरणा स्पर्धेत रेखा वांगडे यांची कन्या कु.स्वरा वांगडे हिने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून पुरस्कार तसेच सन्मान स्वीकारला.शिक्षणासोबतच त्यानी वाचनाचा छंद जोपासला आहे हा छंद जोपासण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना देखील त्यानी प्रोत्साहन देण्याचे काम चालू ठेवले आहे. जीवनात यशस्वी व्हायच असेल तर शिक्षणासोबत वाचनाचा छंद देखील जोपासला पाहिजे असे मत व्यक्त केले.

    तसेच म. गांधी सार्वजनिक वाचनालयाचा या वर्षीचा मानाचा " जीवनगौरव पुरस्कार " मेढा नगरीचे माजी सरपंच , संस्थेचे जेष्ठ सल्लागार डॉ. संपतराव कांबळे यांना देण्यात आला असून संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

 महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा ( तालुका अ वर्ग ) यांचे वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि १७ मार्च २०२४ रोजी स्व .विजया थत्ते सभागृह दुपारी २ वा. संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांचे अध्यक्षतेखाली , संध्या चौगुले ,सोमनाथ काशिळकर, सुर्यकांत देशमुख , डॉ अक्षया कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सल्लागार , संचालक यांचे उपस्थीती मध्ये विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

    यामध्ये संस्थेचा मानाचा " जीवनगौरव पुरस्कार " डॉ. संपतराव कांबळे, स्व सावित्री थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्कार _सौ वंदना प्रशांत गुरव ,सौ रेखा संजय वांगडे , सौ निलम संजय पवार, यांना स्व .जनाबाई मारूती पार्टे आदर्श माता पुरस्कार सौ अनिता युवराज सुर्यवंशी, स्व .मंदाकिनी तुकाराम ओंबळे जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार सौ.जयश्री रविंद्र शेलार, स्व. मंदाकिनी तुकाराम ओंबळे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.मनिषा शंकर मानुगडे उंब्रज, डॉ. एस. आर. रंगनाथन जिल्हास्तरी आदर्श ग्रंथपाल पुरस्कार संजय रामचंद्र शिंदे नगर वाचनालय कराड, स्व .शामराव बापुराव क्षिरसागर गुरुजी जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार लक्ष्मण शिवाजी बने _ काढणे ता पाटण, इत्यादींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    याच कार्यक्रमात विविध स्पर्धा परिक्षांमधून मेढा नगरीतील यशस्वी झालेल्या.अक्षय रमेश खताळ ( सहकार सहाय्यक अधिकारी पुणे आयुक्तालय), प्राची ज्ञानेश्वर संकपाळ ( सहाय्यक पोलीस निरीक्षक), नितीन चंद्रकांत चिंचकर ( सहाय्यक प्रबंधक आर .बी. आय .बँक ) ,रेश्मा भाऊसाहेब बेलोटे ( बी एड पदवीधर शिक्षिका) ,उमेश युवराज सुर्यवंशी ,शाहरुख बशीर खान ( वहातुक निरीक्षक) ,जावेद मुबारक शेख ( भुमि अभिलेख भु माफक अधिकारी) व सौ.. पल्लवी निखिल खताळ( समुदाय आरोग्य अधिकारी ), सौ. प्रियांका श्रीराम किरवे ( आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त )

यांचा सत्कार आणिसन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पार्टे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.