नागठाणे कोहिनूर मंगल कार्यालयातून विवाहप्रसंगी घडलेला सोने चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड.. चोरीला गेलेला ५ तोळे ३ ग्रॅम वजनाचे दागिने केले जप्त.

नागठाणे कोहिनूर मंगल कार्यालयातून विवाहप्रसंगी घडलेला सोने चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड.. चोरीला गेलेला ५ तोळे ३ ग्रॅम वजनाचे दागिने केले जप्त.

----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर.
-------------------------------------------
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा तसेच राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी मालाविरुध्द दाखल गुन्हयाची उकल करणेबाबत सुचना दिल्या होत्या. यादरम्यान कोहीनूर मल्टीपर्पज हॉल नागठाणे ता जि सातारा येथून लग्न सुरु असताना वधू पक्षाच्या खोलीमधून सोन्याचा हार, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याची ठूसी असे एकत्रीत सुमारे 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे 3 लाख 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याबाबत दिनांक 20/03/2024 रोजी बोरगांव पोलीस ठाणे गु र नं 152/2024 भा.द.स.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सपोनि रविंद्र तेलतुंबडे यांनी घटनेचे गांभीर्य विचारात घेवून सदर गुन्हयाचा तपास त्यांच्याकडे घेतला व बोरगांव पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना घडले गुन्ह्याचे संदर्भात योग्य त्या सुचना देवुन गुन्हयाचा तपास सुरु केला. त्यांच्या तपासामध्ये व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीमध्ये वधू व वधूच्या मैत्रिणींचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टीस्ट महिलेवर संशय निर्माण झाला. सपोनि तेलतुंबडे यांनी पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदारांकरवी सदर संशयित महिलेकडे बुध्दी कौशल्याने तपास केला असता सदर मेकअप आर्टीस्ट महिलेनेच दागिने चोरल्याची कबूली दिली. त्याप्रमाणे सपोनि रविंद्र तेलतुंबडे यांनी महिलेकडून गुन्हयात चोरीला गेलेले सर्व 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे 3 लाख 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेले आहेत. 
        सदर कारवाई ही समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांच्या सुचनेप्रमाणे करण्यात आली असून करवाईमध्ये सपोनि रविंद्र तेलतुंबडे, पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक दिपककुमार मांडवे, केतन जाधव, विशाल जाधव व महिला पोलीस अंमलदार प्रियांका पवार मपोहवा नम्रता जाधव, मोनिका निंबाळकर असे सहभागी झाले होते. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि रविंद्र तेलतुंबडे स्वत: करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.