रिसोड येथील कावेरी नेत्रालयाचा स्तुत्य उपक्रम.
रिसोड येथील कावेरी नेत्रालयाचा स्तुत्य उपक्रम.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------
.शहरासह तालुक्यात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक कार्य करणाऱ्या कावेरी नेत्रालय रिसोड यांनी स्तुत्य उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.रिसोड येथील कावेरी नेत्रालयाचे संचालक डॉ. खडसे यांनी एक मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या दरम्यान येणाऱ्या सर्व रुग्णाचे पडदा काढण्याची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून या शस्त्रक्रियेसाठी कोणताही खर्च येणार नाही असा स्तुत्य उपक्रम सुरू केला असून या मोफत शस्त्रक्रियेचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आव्हान कावेरी नेत्रालयाचे संचालक डॉ. खडसे यांनी केले आहे.ज्या रुग्णाचे पडदा काढण्याची शस्त्रक्रिया करायची असेल त्यांनी रिसोड येथील कावेरी नेत्रालय आय.आय.एफ.एल. गोड लोणच्या वर, संत्रे हॉस्पिटल समोर, डॉक्टर जुनगरे बाल रुग्णालय लोणी रोड रिसोड येथे संपर्क साधावा असे आव्हान कावेरी नेत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment