परमिट संपणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या लिंबखिंड नागेवाडी क्रशर व खाण तात्काळ सिल करून बंद करा: किरण बगाडे.
परमिट संपणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या लिंबखिंड नागेवाडी क्रशर व खाण तात्काळ सिल करून बंद करा: किरण बगाडे.
-------------------------------
सातारा प्रतिनिधी
-------------------------------
मा.तहसिलदार सो.सातारा यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची मागणी.
शासन एका बाजूला पर्यावरण संवर्धन यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे यातच नागेवाडी व लिंबखिंड या ठिकाणी 22 ते 23 खाण व क्रशर धारक राजरोजपणे बेकायदेशररित्या नियमांना बगल देत अक्षरशः डोंगरांची चाळण करत आहेत यातून नियमापेक्षा जास्त उत्खनन करून शासनाच्या रॉयल्टीला चुना लावत आहे सर्व क्रशरधारक खाण धारक उत्खनन या व्यवसायातून लाखो रुपयाचा मलिदा खाण्याचे काम सुरू आहे तसेच सदर ठिकाणी विविध सर्वे नंबर व गट नंबर मध्ये रोज किती ब्रास उत्खनन होते त्यातून शासनाला किती रॉयल ते भरले जाते याचा खुलासा सर्कल व तलाठी यांनी करावा तसेच आज अखेर किती खाण धारकांचे परमिटची मुदत अथवा परवाना संपली आहे त्यांच्या सर्वे नंबरची ईटीसी ची च्या मोजणीचा अहवाल सादर करून तसेच सर्कल व तलाठी यांचा प्रत्यक्षदर्शी पाहणी अहवाल याचा आम्हास खुलासा करावा तसेच अवैद्यरित्या उत्खनन मुळे राज्य महामार्ग लगत च येणार जाणाऱ्या नागरिकांना डोळ्यात धुळीचा खूप मोठा त्रास होत असून त्यामूळे श्वसनाचे तसेच डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत तरी लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व अवैध्य उत्खनन करून प्रशासनाला चुना लावणाऱ्या सर्व क्रशर खाण तात्काळ सील करून सर्व क्रशर खाण बंद करा असे झाल्यास लोकशाहीतील मार्गाने आंदोलन छेडणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला
Comments
Post a Comment