Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय भांदक्कर यांचा आरोप गडचांदूर शहरात स्थित माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासन स्थानिक मराठी तरुणाचां छळ करत आहे. येत्या-काही दिवसांत कंपनी विरोधात अक्षय भांदक्कर न्यायालयात धाव घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे!

 अक्षय भांदक्कर यांचा आरोप गडचांदूर शहरात स्थित माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासन स्थानिक मराठी तरुणाचां छळ करत आहे. येत्या-काही दिवसांत कंपनी विरोधात अक्षय भांदक्कर न्यायालयात धाव घेण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे!

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

-----------------------------------

मनसे कार्यकर्ते, मनसेचा गडचांदुर शहरातला नवा चेहरा अक्षय भांदक्कर यांनी कंपनी प्रशासनाला धारेवर धरलं!

एकीकडे हजारो उच्चशिक्षित तरुणांना आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात रोजगार मिळत नाही. आमच्या जागेवर परप्रांतीय कंपनी आमच्यावर राज्य करते. अकुशल व अल्पशिक्षित युवकांना रोजगारासाठी वणवण करावी लागत आहे. शहरात ३ ते ४ अंतरराष्ट्रीय दरज्याचे सीमेंट उद्‌योग आहे याच श्रेणीत गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेल्या माणिकगड सीमेट कंपनी मोठ्‌या डौलाने उभी आहे. निवडणुका जवळ-जवळ आल्या आहे. मतदारांना आपल्या मुलांचं भवितव्य घडविण्याची संधी आलेली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना संघर्ष करण्याची गरज पडलेली आहे. आपल्या गावालगत ४ ते ५ कंपन्या आहे या कंपन्यांमध्ये परप्रांतीय मुलांना - मुलींना नोरीमध्ये जेवढं प्राबल्य आहे. तेवढं आपल्या स्थानिक मुलांना - मुलींना का नाही.? आपली मुलगी शिकून डिग्री घेवून लॉकर मध्ये डिग्री ठेवण्यासाठी शिकवले का आपणं ? मग आपल्या मुला मुलींना या मोठ्या सिमेंट कंपन्यांमध्ये उच्च पदावर नौकरी का मिळत नाही..? आपल्या शहरातील हे बेरोजगारीचे भीषण वास्तव आहे. आपल्या गडचांदुर शहरात भवितव्य घडविणाऱ्या तरुण पिढीला वैफल्याच्या खाईत लोटत आहे. बेरोजगारी, प्रदूषण या मुद्द्याला अनुसरून अक्षय भांदक्कर प्रदूषण नियंत्रण मंडळाला, मानव अधिकार आयोगाला पत्र देणारं व न्यायालयात धाव घेत असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांनी दिली आहेत.

Post a Comment

0 Comments