जबरी चोरीचा बनाव उघड: ८० हजाराचा मुद्देमला हस्तगत ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

 जबरी चोरीचा बनाव उघड: ८० हजाराचा मुद्देमला हस्तगत ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

गांधीनगर:प्रतिनिधि 

आदित्य नैनानी 

-------------------------------

शहापूर पोलीस ठाणे हद्दीत दि.६ रोजी कोरोची ते लक्ष्मी इंडस्ट्रीज जाणा-या रस्त्यावरील ओढयाचे पुढे कोरोचीहुन लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणारे कच्च्या रस्त्यावर ४ अनोळखी इसमांनी कटर, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचेकडील रोख ७९,५००/- रुपये जबरीने चोरुन नेले असलेबाबत फिर्यादी प्रदिप संभाजी माळी रा. गल्ली नं. ११, भाटले मळा, दत्तनगर, शहापूर, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी दिले फिर्यादीवरुन शहापूर पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर ८२/२०२४ भा.दं.वि.सं.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.



सदर जबरी चोरीचा गुन्हा दिवसा ढवळया घडल्याने व ४ अनोळखी इसमांनी फिर्यादीस मारहाण करुन त्यांचेकडील रोख रक्कम ७९,५००/- रुपये लुटुन नेलेने घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी रविंद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलीस उप निरीक्षक शेष मोरे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार संजय इंगवले, प्रशांत कांबळे, संजय कुंभार व महेश खोत यांचे पथक नेमून सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेचे निर्देश दिले होते.


कोल्हापूर जिल्हयातील चोरी, जबरी चोरी व घरफोडी सारखे मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत  पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या आहेत.



त्याप्रमाणे नमुद अधिकारी व अंमलदार हे जबरी चोरीच्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पथकाला सदर गुन्हयातील फिर्यादी प्रदिप माळी यास त्यांचे वडील मोजकेच पैसे देत असून त्याने त्याचे वैयक्तिक गरजांसाठी त्याचा मित्र मोहसीन मुल्ला याचे मदतीने सदर जबरी चोरी गुन्हा घडलेचा बनाव केला असून ती रक्कम प्रदिप माळी व त्याचा मित्र मोहसीन मुल्ला यांचेकडेच असून ते दोघे सदर पैशाची विल्हेवाट लावणेकरीता तिळवणी गावचे हद्दीतील विजयानगरी येथील प्लॉटींगचे मोकळया जागेत येणार आहेत अशी गोपनीय बातमी प्राप्त झाली. सदर बातमीचे अनुषंगाने सापळा कारवाईचे आयोजन करुन प्रदिप माळी व त्याचा मित्र मोहसीन मुल्ला यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्ज्यात गुन्हयातील ७५,०००/- रुपये रोख रक्कम व १,०००/- रुपये किंमतीचा आयटेल मोबाईल फोन असा एकूण ७६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आलेने तो कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केलेला आहे. सदर जबरी चोरीचा गुन्हा घडला नसून वैयक्तिक गरजांसाठी फिर्यादी प्रदिप माळी यानेच ते पैसे हडप करणेच्या उद्देशाने बनाव केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.



सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संजय इंगवले, प्रशांत कांबळे, संजय कुंभार, महेश खोत व यशवंत कुंभार यांचे पथकाने केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.