Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकरिणीचा विस्तार आज येथील दसरा चौक येथे संघाच्या कार्यालयात पार पडला.

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकरिणीचा विस्तार आज येथील दसरा चौक येथे संघाच्या कार्यालयात पार पडला.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर, प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------

आगामी काळात पत्रकारांना ना नफा ना तोटा या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध योजना राबवून पत्रकार बांधवांसाठी कुटुंबकल्याण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी दिली.या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भ पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.तसेच येणाऱ्या काळात पत्रकार बांधवांच्या साठी संघटन मजबूत करण्याची ग्वाही सर्व पदाधिकारी यांनी दिली.पत्रकारांसाठी अग्रेसर असणारी संस्था म्हणून नवी ओळख करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.बदलत्या काळानुसार पत्रकार बांधवाना प्रशिक्षण देऊन सक्षम करू आणि माहिती तंत्रज्ञान युगातील नवा पत्रकार घडवू अशी ग्वाही देण्यात आली.वेगवेगळ्या योजना घेऊन पत्रकारांसाठी प्राधान्याने कार्यरत राहून कुटुंबियांसाठी भरीव काम करणारी एकमेव संघटना म्हणून उदयास आणणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.सामाजिक,राजकीय स्तरावर पत्रकार बांधवाना मानसन्मान मिळवून दर्जात्मक काम करण्यासाठी मजबूत व्यासपीठ यानिमित्ताने निर्माण होत आहे.यावेळी पत्रकार बांधवांची होणारी आर्थिक परवड कश्या पद्धतीने सोडवता येईल यावर धीरज रुकडे यांनी पर्याय कसा शोधता येईल याबाबत मार्गदर्शन केले ज्यातून भविष्यात एक मोठी पत्रकार कुटुंबकल्याण संस्थेच्या बिजारोपणाची तयारी सुरू असल्याची सांगितले. अल्पावधीतच संपूर्ण जिल्ह्यातून तळागाळातील पत्रकार महिला सुद्धा यामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे प्रथमच पत्रकार बांधवांसाठी एक आश्वासक व्यासपीठ या माध्यमातून उभे राहत आहे.पत्रकारिता आज एक वेगळ्या वळणावर पोचली असून आता एकसंघ राहण्याची गरज निर्माण झाली आहे.संघटन मजबूत असेल तर मजबूत पत्रकार नक्कीच घडेल असा सूर या कार्यक्रमात दिसून आला.“मेडिक्लेम चा प्रीमियम वेळेत भरला तर वैद्यकीय प्रोब्लेमचा क्लेम विनासायास मंजूर होतो तसे संघटनेसाठी योगदानरुपी प्रीमियम सर्वांनी वेळेत दिल्यास पत्रकारांच्या भविष्यात उदभवणाऱ्या सर्व प्रॉब्लेम चा मदतरुपी क्लेम यातून मंजूर होऊ शकतो” असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी करून उपस्थितांची मने जिंकली. घाचे संस्थापक संजय भोकरे व प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची वाटचाल सुरू असून चांगले उपक्रम राबविण्याचा मानस सर्वच पदाधिकारी यांनी दिला.सदरच्या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान,जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे, जिल्हा सचिव नवाब शेख,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील,राजेंद्र मकोटे,कमलाकर वरटेकर, कृष्णराज गिरी,सुभाष माने,,, विजय बकरे शिवाजी पाटील पांडुरंग पवार बबलू मुल्ला तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments