Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सनराइज् योगा ग्रुपचा महिला दिन उत्साहात.

 सनराइज् योगा ग्रुपचा महिला दिन उत्साहात.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोरपना प्रतिनिधी

---------------------------------

कोरपना - सनराइज् योगा ग्रुप, गडचांदूरच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्थानिक बालाजी सभागृहात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

        यावेळी महिलांसाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. महिलांकरिता मार्गदर्शन व विविध नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका स्मिता चिताडे उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक प्रा. आशिष देरकर, डॉ. गुलवाडे, नलिनी खेकडे, अर्चना चौधरी, ममता बोढाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांनी वेगवेगळे नृत्य सादर केली.

           कार्यक्रमाचे संचालन अंजली कुरेकर यांनी केले प्रास्ताविक सनराइज् योगा ग्रुपच्या संचालक कुंतल चव्हाण यांनी केले. यशस्वीतेकरिता सर्व महिलांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments