Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

करवीर पोलीसांनी ठोकल्या सराईत गुन्हेगारास बेड्या.

करवीर पोलीसांनी ठोकल्या सराईत गुन्हेगारास बेड्या.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

दिनांक 05/12/2023 या भर दुपारी दिवशी शिंगणापूर फाटा येथे रवी राजू भोसले या युवकावर एडका व तलवारीने प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या त्र्यंबक वसत गवळी व व 36 रा राजेंद्र नगर कोल्हापूर यांस लक्ष्मी पुरी मधील स्वास्तिक हाँटेलमधून करवीर हेड कॉन्स्टेबल सुजय दावणे विजय तळसकर यांनी ताब्यात घेतले.

या घटनेची आधीक माहिती अशी की पो हे कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर यांना सराईत गुन्हेगार त्र्यंबक वसत गवळी हा स्वस्तिक हॉटेलमध्ये जेवण करण्यास येणार असल्याची पक्की खबर मिळाली होती सदर गुन्हेगारांवर जुना राजवाडा पोलिस व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत 

हि कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल सरवडेकर,विजय तळसकर, सुजय दावणे, रणजीत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश शिंदे, विजय पाटील, अमोल चव्हाण, अमित जाधव यांनी केली

Post a Comment

0 Comments